Hardik Pandya Video : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad) हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दरम्यान गुजरात टायटन्स संघाची यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेत असून त्याची संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी उत्तम आहे. पांड्याची फॅन फॉलोविंग सोशल मीडियावर देखील कमाल असल्याने त्याचे अनेक चाहते आहेत. या सर्व चाहत्यांमध्ये सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.


हा व्हिडीओ हार्दिक आणि त्याचा मुलगा अगस्त्या याचा असून गुजरात टायटन्स संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिक पांड्या त्याचा मुलगा अगस्त्याला हात मिळवत हँडशेक करताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेकांनी लाईक केलं असून बरेचजण कमेंट्स करत व्हिडीओ शेअर देखील करत आहेत. 


 


आज गुजरात विरुद्ध हैदराबाद लढत


आयपीएलमध्ये (IPL 2022) आज गुजरात टायटन्स संघ विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी तशी कमाल आहे. त्यामुळे त्यांचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित झालं असलं तरी त्यांना आज विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातने 7 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन तिसरं स्थान मिळवलं आहे. दोघांचा फॉर्म चांगला असल्याने आजचा सामनाही रोमहर्षक होऊ शकतो.


हे देखील वाचा-