GT vs SRH, 1 Innings Highlight : नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणाऱ्या सनरायजर्स हैदराबादचा सामना गुजरात टायटन्स (SRH vs GT)या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने कर्णधार हार्दिक पंड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादसमोर 163 धावांचे आव्हान ठेवले आहे. हार्दिक आणि अभिनव मनोहर यांनी केलेल्या एका उत्तम भागिदारीमुळेच गुजरातने एक आव्हानात्मक लक्ष्य हैदराबादसमोर ठेवलं आहे. 


आयपीएलच्या आजच्या सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकत हैदराबदाने गोलंदाजी निवडली. त्यानुसार वेगवान गोलंदाजांनी एकमागोमाग एक विकेट्स देखील घेण्यास सुरुवात केली. गुजरातचे गडी एकामागोमाग एक बाद होत असताना एका बाजूला कर्णधार हार्दिकने लढा कायम ठेवला. त्याने 42 चेंडूत नाबाद 50 धावा ठोकल्या. काही काळासाठी अभिनव मनोहर (35) याची त्याला साथ देखील मिळाली. ज्यामुळे 20 षटकात 7 गडी गमावात गुजरातने 162 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर, टी. नटराजन यांनी प्रत्येकी दोन तर मार्को आणि उम्रान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर गुजरातचा एक गडी धावचीत झाला. 



गुजरात अंतिम 11  


शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, दर्शन नालकांडे 


हैदराबादचे अंतिम 11  


अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, टी. नटराजन, उम्रान मलिक


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha