IPL 2022 : आयपीएलच्या 15व्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात 10 संघ एकमेकांसोबत लढणार आहेत. पंधराव्या हंगामाता पहिला सामना आज गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गेल्या वर्षीचा उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात आहे. 2011 नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित T20 ट्रॉफीसाठी 10 संघ भिडणार आहेत.
जडेजा सांभाळणार चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद
महेंद्रसिंह धोनीचा आयपीएलमधील हा शेवटचा हंगाम असू शकतो. पहिल्या सामन्यापूर्वी धोनीने कर्णधारपद सोडून रवींद्र जडेजाकडे कमान सोपवली आहे. त्यामुळे आज सर्वांच्या नजरा जडेजावर असतील. 2008 पासून धोनी नेतृत्व करत असलेल्या संघाने नेतृत्व जडेजाला करायचे असून हा संघ चार वेळा विजेता आहे.
यावेळी श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांच्या नेतृत्व कौशल्याचीही चाचणी घेतली जाईल. अय्यर केकेआरचे नेतृत्व करणार आहे तर राहुल लखनऊ आणि हार्दिक गुजरातचे नेतृत्व सांभाळेल. अग्रवालला पंजाबचा कर्णधार बनवण्यात आले आहे. अय्यरने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे तर राहुल पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. हार्दिकसाठी आयपीएलमधील कर्णधारपदाचा हा पहिलाच अनुभव असेल. नियमितपणे गोलंदाजी न केल्यामुळे राष्ट्रीय संघातील स्थान गमावल्याने त्याची प्रगतीही भारतीय संघ व्यवस्थापनाने बारकाईने पाहिली आहे.
लखनौ सुपरजायंट्स, गुजरात टायटन्स नवे संघ
यावेळी लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्सच्या रूपाने दोन नवीन संघ आयपीएलमध्ये पदार्पण करतील. देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर क्रिकेटप्रेमींना 2019 नंतर प्रथमच स्टेडियममध्ये सामन्यांचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. आयपीएलचे सर्व सामने भारतात खेळवले जातील आणि स्टेडियमच्या क्षमतेपैकी 25 टक्के प्रेक्षक स्टेडियममध्ये सामना पाहू शकतील. दोन नवीन संघांच्या समावेशासह, एकूण सामन्यांची संख्या 60 वरून 74 झाली आहे
महत्त्वाच्या बातम्या :
- IPL 2022 Dates : आयपीएलमध्ये 'दस का दम'! पाहा संपूर्ण वेळापत्रक
- BCCIचा धाडसी निर्णय; 2023 मध्ये महिला आयपीएल स्पर्धेचं आयोजन
- IPL 2022 : जोश तोच... अंदाज नवा! आयपीएलच्या 15 व्या मोसमात नवं काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha