IPL 2022 Full Schedule : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही तास शिल्लक आहेत. मुंबईत 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडणार आहे.  कोरोनामुळे यंदा आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी पार पडणार आहेत.

आयपीएल 2022 हा 15 वा हंगाम भारतामध्ये कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे. लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील चार ठिकाणी होणार आहेत. मुंबईतील वानखेडे मैदानावर 20, ब्रेबॉन मैदानावर 15, डीवाय पाटील मैदानावर 20 आणि पुण्यातील मैदानावर 15 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघाला समान संधी मिळेल यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक संघाचे चार चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअम या मैदानावर होणार आहे. तर प्रत्येक संघाचे तीन तीन सामने ब्रेबॉन आणि पुणे मैदानावर होणार आहेत. प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये 14 सामने खेळणार आहे. त्यामध्ये पाच संघाविरोधात प्रत्येक संघाला दोन तर चार संघाविरोधात एक एक सामना खेळावा लागणार आहे.

पाहा संपूर्ण वेळापत्रक.....



पाहा ग्रुप - 

 

ग्रुप अ

 

1

MI(5)

2

CSK(4)

3

KKR(2)

4

SRH(1)

5

RR(1)

6

RCB

7

DC

8

PBKS

9

LSG

10

GT

प्रत्येक संघ आपल्या ग्रुपमधील इतर चार संघाविरोधात प्रत्येकी दोन सामने खेळेल. तसेच दुसऱ्या ग्रुपमधील एका संघाबरोबर दोन सामने खेळणार आहे.  तर दुसऱ्या ग्रुपमधील इतर संघाबरोबर प्रत्येकी एक एक सामना खेळावा लागेल. उदा. ग्रुप अ मध्ये मुंबई  कोलकाता, राजस्थान, दिल्ली आणि लखनौ या संघाबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर ब ग्रुपमधील चेन्नई संघाबरोबर दोन सामने खेळणार आहे.  ब ग्रुपमधील इतर संघाविरोधात मुंबई प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. याचप्रमाणे ग्रुप बी मध्ये आरसीबीचा संघ चेन्नई, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात या संघाबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर ग्रुप अ मधील राजस्थान संघाविरोधात दोन सामने खेळेल अन् इतर संघाविरोधात प्रत्येकी एक एक सामना खेळणार आहे.

कोणत्या संघाचे कुणाबरोबर किती सामने?
संघ MI KKR RR DC LSG CSK SRH RCB PBKS GT एकूण
↓प्रतिस्पर्धी| सत्र- > 2022 2022 2022 2022 2022 2022 2022 2022 2022 2022  
MI 0 2 2 2 2 2 1 1 1 1 14
KKR 2 0 2 2 2 1 2 1 1 1 14
RR 2 2 0 2 2 1 1 2 1 1 14
DC 2 2 2 0 2 1 1 1 2 1 14
LSG 2 2 2 2 0 1 1 1 1 2 14
CSK 2 1 1 1 1 0 2 2 2 2 14
SRH 1 2 1 1 1 2 0 2 2 2 14
RCB 1 1 2 1 1 2 2 0 2 2 14
PBKS 1 1 1 2 1 2 2 2 0 2 14
GT 1 1 1 1 2 2 2 2 2 0 14
एकूण सामने / Team 14 14 14 14 14 14 14 14 14 14