Women's IPL T20: पुरुषांप्रमाणेच आता भारतात महिला आयपीएल स्पर्धा सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने यासाठी दुजोरा दिला आहे. पुढील वर्षी महिला आयपीएलचं आयोजन कऱण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या आयपीएलच्या गवर्निंग काउंसिल बैठकीत 2023 पासून सहा महिला संघाची आयपीएल स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, "महिला आयपीएलला एजीएमद्वारे परवानगी मिळणे बाकी आहे. पुढील वर्षापर्यंत महिलांचे आयपीएल सुरू होण्याची आम्हाला अपेक्षा आहे." दरम्यान मागील काही वर्षांपासून बीसीसीआय महिला आयपीएल स्पर्धा भरवण्याची तयारी करत होता. वेस्ट विडिंज आणि पाकिस्तान यांनी महिला लीग टी 20 स्पर्धा करण्याचे आयोजन केल्यानंतर बीसीसीआयवर दबाव निर्माण झाला होता.
सुरुवातीला महिला आयपीएलमध्ये पाच ते सहा संघाचा समावेश कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरुष आयपीएलमधील सध्याच्या दहा संघांच्या मालकांना महिला संघ खरेदी करण्यास पहिल्यांदा संधी दिली जाणार आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर सांगितले की, महिला आयपीएलला मंजुरी मिळाली आहे. पुढील वर्षांपासून स्पर्धा सुरु होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने 2023 मध्ये महिला आयपीएल सुरु होण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. आयपीएल चेयरमन बृजेश पटेल यांनाही याला दुजोरा दिला होता.
महिला टी-20 चॅलेंज टूर्नामेंट या वर्षी पुन्हा परतेल, असा निर्णय बोर्डाने घेतला. ही तीन संघांची स्पर्धा 2019 मध्ये सुरू झाली, जी आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांदरम्यान खेळली गेली. गतवर्षी केवळ 4 सामन्यांची ही स्पर्धा होऊ शकली नाही. आता या मोसमाचे आयोजन मे महिन्यात प्लेऑफ सामन्यांच्या आसपास केले जाईल. दरम्यान महिला टी२० चॅलेंजरमध्ये ट्रेलब्लेजर्स, सुपरनोवाज आणि व्हेलोसिटी हे संघ खेळतात. सुपरनोवाज संघाने २०१८ आणि २०१९ मध्ये विजेतेपद पटाकवले होते. तर २०२० मध्ये ट्रेलब्लेजर्स संघ पहिल्यांदा विजेता बनला होता. २०२१ मध्ये कोरोनामुळे महिली टी२० चॅलेंजरचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यंदा ही लीग खेळवली जाईल.