IPL 2022 Final LIVE Blog : गुजरातनं जिंकली आयपीएल 2022, 7 विकेट्सनं मिळवला विजय
IPL 2022 Final GT vs RR LIVE Updates:अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार आहे. हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहे.
सामन्यात विजयी संघाचा कर्णधार हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली. गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्याने 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात संजू, बटलर आणि हेटमायर या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. याशिवाय त्याने फलंदाजीत 30 चेंडूत 34 धावा केल्या. ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
राजस्थानच्या 131 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत 18.1 षटकात 7 गडी राखून विजय मिळवला आहे.
युजवेंद्र चहलने महत्त्वाची विकेट घेत हार्दिक पांड्याला झेलबाद केलं आहे.
कर्णधार हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांनी गुजरातचा डाव सावरला आहे. हार्दिक 15 तर गिल 26 धावांवर खेळत आहे. गुजरात दोन बाद 61 धावा
मॅथ्यू वेडच्या रुपाने गुजरातला दुसरा धक्का बसलाय. बोल्टने वेडला 8 धावांवर बाद केलेय
गुजरातच्या डावाची 4 षटकं आटोपली असून त्यांनी एक गडी गमावत 22 धावा केल्या आहेत.
गुजरात टायटन्सचा सलामवीर रिद्धिमान साहा 5 धावा करुन बाद झाला आहे. प्रसिद्ध कृष्णाने त्याला तंबूत धाडलं आहे.
राजस्थान रॉयल्सने केवळ 130 धावाच केल्याने गुजरातला विजयासाठी 131 धावा करायच्या आहेत.
साईकिशोरने आणखी एक गडी बाद करत ट्रेन्ट बोल्टला 11 धावांवर तंबूत धाडलं आहे.
अश्विनच्या रुपाने राजस्थानला सहावा धक्का बसला आहे. आता राजस्थानची सर्व मदार रियान परागवर आहेत. राजस्थान सहा बाद 101 धावा
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानची फलंदाजी कोलमडली आहे. हार्दिक पांड्याने शिमरोन हेटमायरला बाद करत राजस्थानला पाचवा धक्का दिलाय. हार्दिक पांड्याने तिसरी विकेट घेतली..
हार्दिक पांड्याने आधी संजूला बाद केल्यानंतर आता जोस बटलरला तंबूत धाडलं आहे. बटलने 39 रन केले आहेत.
राशिद खानने अप्रतिम चेंडू टाकत देवदत्त पडिक्कलला शमी हाती झेलबाद करवलं आहे. पडिक्कल 2 धावा करुन बाद झाला आहे.
हार्दिक पांड्याने राजस्थानचा कर्णधार संजूला बाद केलं. 14 धावांवर संजू साई किशोरच्या हाती झेलबाद झाला.
सामन्यातील 8 षटकं संपली असून 59 धावा राजस्थाननच्या पूर्ण झाल्या असून त्यांनी एक विकेटही गमावली आहे.
राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जायस्वाल 16 चेंडूत 22 धावा करुन बाद झाला आहे. आल्यापासून दमदार खेळी करण्याच्या प्रयत्नात असणारा यशस्वी झेलबादचं झाला आहे.
राजस्थानने प्रथम फलंदाजी निवडल्यामुळे त्यांचे सलामीवीर मैदानात आले आहेत. बटलर आणि यशस्वी सध्या मैदानात असून 2 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 7/0 अशी आहे.
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मकॉय, युझवेंद्र चहल.
शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, लॉकी फर्ग्यूसन, आर साई किशोर, मोहम्मद शमी, यश दयाल.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
आय़पीएलच्या महामुकाबल्याआधी या मैदानात सर्वात मोठी जर्सी सादर करण्यात आली आहे.
IPL 2022 Final Live Updates : आयपीएलच्या फायनलध्ये पावसाबाबत अनेक नियम आहेत. आयपीएलने फायनलसाठी राखीव दिवस ठेवलाय. पण राखीव दिवसापर्यंत पोहचण्याआधीही काही नियम आहेत. एका न्यूज वेबसाईटनुसार, जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तर 9.20 पर्यंत सामना सुरु केला जाऊ शकतो.. अशावेळी एकही षटक कमी होणार नाही, सामना पूर्ण 20-20 षटकांचा होणार आहे. जर लवकर पाऊस थांबलाच नाही.. अन् 12 वाजता खेळ सुरु झाला तर सामना पाच पाच षटकांचा होईल. पाच षटकांचाही खेळ होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर होणार. सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकली नाही तर राखीव दिवसाचा वापर केला जाईल.. राखीव दिवशी म्हणजे, सोमवारी 30 मे रोजी सामना होणार... पण राखीव दिवशीही पावसामुळे सामना न झाल्यास गुणतालिकेनुसार विजयी घोषीत केला जाईल.. म्हणजे, दोन दिवस पावसामुळे सामना न झाल्यास हार्दिक पांड्याच्या गुजरातला विजयी घोषीत केले जाईल.
आयपीएल 2022 च्या समारोप सोहळ्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्यासह उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सामन्याला गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि राज्यातील काही राजकीय व्यक्ती देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील गुजरातमध्येच असल्याने ते देखील कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे.
अहमदाबादमध्ये रविवारी अंतिम सामन्याच्या दिवशी कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस असू शकते. तर, किमान तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील आणि रात्री तापमानात घट होऊ शकते. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात पावसाचा धोका नाही. परंतु, येथे ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे.
जोस बटलर, यशस्वी जायस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मकॉय, युजवेंद्र चहल.
शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, आर साई किशोर, मोहम्मद शमी, यश दयाल.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत
पार्श्वभूमी
IPL 2022 Final GT vs RR LIVE : क्रिकेटचा महासंग्राम अर्थात आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जात आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार असून यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे. गुजरातच्या टायटन्सचा जल्लोष...की राजस्थानचा 'रॉयल मार्च?' यापैकी नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता जगभरातल्या तमाम आयपीएलचाहत्यांना आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची मेगा फायनल आणि या मेगा फायनलमध्ये हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत.
गुजरातचा संघ पदार्पणातच यंदाच्या मोसमातला सर्वात यशस्वी संघ ठरला. हार्दिक पंड्याचं नेतृत्व, डेव्हिड मिलरचा अनुभव, रशिद खानची जादूई फिरकी यासह संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मोलाचं योगदान गुजरात टायटन्सला आयपीएलच्या फायनलमध्ये घेऊन गेलंय. गुजरातचा संघ आयपीएलच्या रणांगणात नवखा असला, तरी तो पदार्पणात सर्वात यशस्वी संघ ठरलाय. हार्दिक पंड्याच्या या फौजेनं साखळीत १४ पैकी १० सामने जिंकले. आणि मग क्वालिफायरची पायरी एकाच फटक्यात पार करुन सहजपणे फायनल गाठली. त्यामुळे फायनलमध्ये गुजरातचं पारडं जड मानलं जातंय.
इकडे संजू सॅमनसनच्या राजस्थानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागलाय. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात त्यांचा गुजरातकडून पराभव झाला.पण राजस्थानची 'रॉयल' ब्रिगेड दुसऱ्या क्वालिफायरमध्ये नेटानं लढली. आणि बंगलोरला हरवून राजस्थाननं आपला 14 वर्षांचा वनवास संपवला. तुम्हाला आठवत असेल की 2008 सालच्या पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स हाच संघ विजेता ठरला होता. पण त्यानंतर राजस्थानला एकदाही विजेतेपद सोडा पण अंतिम फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळं यंदा तब्बल १४ वर्षांनी राजस्थान फायनमध्ये खेळताना दिसणार आहे.
अशी आहे अंतिम 11
गुजरात - शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, लॉकी फर्ग्यूसन, आर साई किशोर, मोहम्मद शमी, यश दयाल.
राजस्थान -जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मकॉय, युझवेंद्र चहल.
हे देखील वाचा-
- Womens T20 Challenge : हरमनप्रीतचा सुपरनोवाज तिसऱ्यांदा चॅम्पियन, व्हेलोसिटीचा पराभव
- IPL 2022 Final : फायनलचा थरार... गुजरातच्या टायटन्सचा जल्लोष...की राजस्थानचा 'रॉयल मार्च?'
- IPL Final : ऐकलत का? हार्दिक पांड्या आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही फायनल हरला नाही
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -