IPL 2022: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या (Mumbai Indians) संघानं दिल्लीसमोर 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघानं सलामीवीर ईशान किशनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 20 षटकात विकेट्स गमावून दिल्लीसमोर धावांचं लक्ष्य ठेवलंय. दरम्यान, ईशान किशननं 48 चेंडूत 81 धावा केल्या आहेत.


मुंबईकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी उतरले. त्यानंतर दोघांनीही  मैदानावर आपली पकड जमवली असून दोघेही संयम राखून खेळी दाखवली. परंतु, मुंबईचा संघ 28 धावांवर असताना रोहित शर्माच्या रुपात त्यांना पहिला झटका लागला. रोहित शर्मा 41 धावा करून बाद झाला. रोहित शर्मापाठोपाठ तिलक वर्माही बाद झाला. त्यावेळी मुंबईचा स्कोर 14 षटकांत 118 धावा झाल्या आहेत. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी करण्यासाठी मैदानात आलेल्या किरॉन पोलार्डला मोठी धावसंख्या करता आली नाही. किरॉन पोलार्ड फक्त आठ धावा करून माघारी परतला. दरम्यान, ईशान किशनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबईनं 20 षटकात पाच विकेट्स गमावून दिल्लीसमोर 178 धावांचे लक्ष्य ठेवलं. ईशान किशन 48 चेंडूत 81 धावा केल्या. दिल्लीकडून मुरगन अश्विन, बेसिल थम्पी यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. तर, टायमल मिल्सला एक विकेट्स मिळाली आहे. 



संघ-


दिल्लीचा संघ- पृथ्वी शॉ, टिम सेफर्ट, मनदीप सिंग, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी. 


बंगळुरूचा संघ-  रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, अनमोलप्रीत सिंग, किरॉन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha