MI vs DC IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई प्रथम फलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
मुंबईकडून रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला उतरणार आहेत. तर सुर्यकुमारच्या अनुपस्थितीत तिलक वर्माला दुसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात येणार आहे. अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टीम डेविड आणि डॅनिअल सॅम्स यांना संधी देण्यात आली आहे. मुर्गन अश्वीनवर फिरकी गोलंदाजी धुरा असणार आहे. दिल्लीच्या संघात डेविड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना अनुपस्थित राहणार आहे. त्यामुळे टाम सायफंटला संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मनदीप सिंह खेळणार आहे. पंत आणि रॉमवेन पॉवेल यांच्यावर मधल्या फळीतील जबाबदारी असणार आहे. अक्षर पटेल, ललीत यादव आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीची धुरा असणार आहे. तर खलील अहमद आणि कमलेश नागरकोटी यांच्या वेगवान गोलंदाजी धुरा असणार आहे.
IPL 2022 च्या मेगा लिलावात खेळाडूंना विकत घेण्यासाठी संघाकडे कमी पैसे उपलब्ध होते. पण थोड्या पैशातही दिल्लीने दर्जेदार खेळाडूंना खरेदी केलं आहे. संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतचा अनुभव आणि जोशवर विश्वास दाखवलाय. ऋषभ पंत हा विश्वास सार्थ करणार का? गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंत याची भारतीय संघातील कामगिरी सुधारली आहे. तो भन्नाट फॉर्ममध्ये आहे. याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न दिल्ली संघ करत आहे. तर मुंबईने लिलावापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. त्यानंतर ईशान किशनला तब्बल 15.25 कोटी देत संघात घेतलं. याशिवाय जोफ्रा, टीम डेव्हिड, डेवाल्ड अशा काही खेळाडूंवर कोट्यवधी खर्च केले आहेत.
मुंबईचा संघ –
इशान किशन, रोहित शर्मा, तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टीम डेविड, डॅनिअल सॅम्स, मुर्गन अश्विन, टायले मिल्स, जसप्रीत बुमराह, बसील थम्पी
दिल्लीचा संघ -
पृथ्वी शॉ, टीम सायफंट, मनदीप सिंह, ऋषभ पंत, रॉमवेन पॉवेल, ललीत यादव, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, खलील अहमद