ICC World Cup IND W vs SA W: महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला आहे. आफ्रिकेनं भारतीय महिला संघाचा तीन विकेटनी पराभव केला. भारताने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेपुढे 275 धावांचे आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान आफ्रिकेच्या संघानं शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. शेवटच्या बॉलपर्यंत या मॅचचा थरार पाहायला मिळाला. अखेर चुरशीच्या लढतीत आफ्रिकेनं बाजी मारली.


आफ्रिकेकडून लौरा वोल्वार्टने चांगली फलंदाजी केली. तिने 80 धावांची दमदार खेळी केली. तसेच आफ्रिकेच्या मिग्नॉन डू प्रीजची 52 धावांची दमदार खेळी केली. दरम्यान, या पराभवामुळं भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हानं संपुष्टात आले आहे. जर इग्लंड आजची मॅच हरला तर आणि भारत जिंकला असता तर भारताला सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी होती.


दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेपुढं 274 धावांचे आव्हान ठेवले आहे. सात विकेटच्या बदल्यात भारतीय महिला संघाने 50 षटकात 274 धावा केल्या होत्या. यामध्ये स्मृती मानधना, शेफाली वर्मा आणि कर्णधार मिथाली राज यांनी अर्धशतके केली आहेत. या तिघींच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 274 धावा केल्या होत्या. प्रथम फलदांजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. शेफाली वर्माने विश्वचषकातील पहिले अर्धशतक ठोकले. त्यानंतर ती 53 धावा करुन बाद झाली. त्यानंतर खेळायला आलेली यस्तिका भाटिया दोन धावा करुन बाद झाली. त्यानंतर आलेल्या कर्णधार मिथाली राजने स्मृती मानधनाला चांगली साथ दिली. या दोघींनीही अर्धशतके झळकावली. स्मृती मानधनाने 71 धावा केल्या, तर मिथाली राजने 68 धावांची खेळी केली. तसेच हरमीनप्रीत कौरने 48 धावांची खेळी केली.


या विश्वचषकातील आजचा सामना भारतीय महिला संघासाठी महत्त्वाचा मानला जात होता. कारण सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं होतं. मात्र, भारतीय संघाने ती संधी गमावली आहे. आजचा सामना जर भारत जिंकला असता आणि तिकडे इंग्लड जर आजचा सामना पराभूत झाला असता तर भारताला सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र, आता भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.