RCB vs LSG : आयपीएल 2022 (Ipl 2022) स्पर्धेच्या एलिमेनेटर सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने लखनौ सुपरजायंट्स संघाला 14 धावांनी मात दिली. बंगळुरुने प्रथम फलंदाजी करत रजत पाटीदारच्या दमदार 112 धावांच्या जोरावर आणि दिनेश कार्तिकच्या 37 धावांच्या तुफान फटकेबाजीमुळे 207 धावा स्कोरबोर्डवर लावल्या, ज्याचा पाठलाग करताना लखनौचा संघ केवळ 193 धावाच करु शकला, तर या पराभवामागील काही महत्त्वाची कारण कोणती ते जाणून घेऊ...


1. दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) झेल सोडणं : बंगळुरु संघाकडून 37 धावांची छोटी पण तुफान खेळी करणारा दिनेश कार्तिक जेव्हा 6 चेंडूत 2 धावांवर खेळत होता, तेव्हा त्याचा झेल लखनौचा कर्णधार केएल राहुलने ड्रॉप केला. 15 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हे घडलं. ज्यानंतर मात्र दिनेशने 17 चेंडूत 35 रन ठोकले. ज्यामुळेच आरसीबी 200 चा आकडा पार करु शकली. 


2. रजत पाटीदारचा (Rajat Patidar) झेल सोडणं : आधी दिनेश कार्तिकचा झेल सोडल्यानंतर 16 व्या षचकात लखनौने रजत पाटीदारचा झेल देखील सोडला. यावेळी दीपक हुडाने हा कॅच ड्रॉप केला. रजत त्यावेळी 40 चेंडूत 72 धावांवर खेळत होता. त्यानंतर पुढील 14 चेंडूत त्याने 40 रन केले. ज्यामुळे संघाची धावसंख्या अधिक होऊ शकली. 


3. डेथ ओवर्समध्ये आरसीबीची भेदक गोलंदाजी : विजय मिळवणाऱ्या आरसीबी संघाकडून एक मोठी धावसंख्या करण्यात आली होती. पण लखनौ संघाचा कर्णधार राहुल आणि दीपक हुडा यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे हे लक्ष्य जवळपास पूर्ण होईल असं वाटत होतं. पण त्याचवेळी अखेरच्या अर्थात डेथ ओव्हर्समध्ये आरसीबीच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली, ज्यामुळे लखनौला निर्धारीत टार्गेट पूर्ण  करता आलं नाही आणि त्यांचा 14 धावांनी पराभव झाला. यावेळी हर्षल पटेल आणि जोस हेजलवुड यांनी उत्तम अशी भेदक गोलंदाजी केली. हर्षलने दोन षटकात 17 तर जोसने एका षटकात केवळ 9 रन दिले.


असा पार पडला सामना


नाणेफेक जिंकून लखनौचा कर्णधार राहुलने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर बंगळुरुची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आणि कर्णधार फाफ शून्यावर बाद झाल्यानंतर रजतने संघाचा डाव सांभाळला. रजतने दमदार असं शतक लगावल्याने आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावरच हा धावांचा डोंगर उभा केला. 208 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला क्विंटन डिकॉक अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. संघाकडून केवळ राहुल आणि दीपक हुड्डा यांनी चांगली फलंदाजी केली. 61 चेंडूत 96 धावांची भागिदारी दोघांनी केली. दीपक हुड्डा 26 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. तर राहुलही 79 धावांवर बाद धाला. ज्यानंतर अखेरच्या षटकात लुईसला लखनौला विजय मिळवून देण्यात अपयश आले आणि आरसीबीचा 14 धावांनी विजय झाला.


 हे देखील वाचा-