RR vs GT: कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) मंगळवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएल 2022 मधील पहिला क्वालिफायर सामना खेळण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह गुजरातच्या संघानं अंतिम फेरी गाठली. या सामन्यापूर्वी बसराणी देव नावाच्या ट्विटर हँडलवरून संजू सॅमसनबाबत भविष्यवाणी केली होती. गुजरातविरुद्ध सामन्यात संजू सॅमसन 47 धावा करून बाद होईल, असं त्यानं म्हटलं होतं आणि त्याची भविष्यवाणी खरी ठरली. या सामन्यात संजू सॅमसन 14 धावा करून माघारी परतला. या व्यक्तीनं याआधी अनेक क्रिकेट सामन्यांशी निगडीत ट्वीट केलं आहे. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, या व्यक्तीनं याआधी रॉयल चॅलेंज बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीची भविष्यवाणी केली होती. 


ट्वीट-



दरम्यान, 23 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2022 च्या 36 व्या सामना खेळला गेला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात बंगळुरूच्या संघाला नऊ विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात विराट कोहली मार्को यान्सिनच्या गोलंदाजीवर बाद होणार, अशी भविष्यवाणी करण्यात आली होती आणि सामन्यातही असंच घडलं. संजू सॅमसन आणि विराट कोहलीची भविष्यवाणी करणारा व्यक्ती एकच आहे. एवढेच नव्हेतर त्यानं मुंबईविरुद्ध सामन्यात केएल राहुल शतक मारणार असल्याची भविष्यवाणी केली होती. 


ट्वीट- 



सोशल मीडियावर या भविष्यकथनाचा अचूक अंदाज पाहून युजर्सकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणी त्याला विचारत आहे की आमची गर्लफ्रेंड कधी येणार आहे? तर, कोणी त्याला विचारत आहे की आजच्या एलिमिनेटर सामन्यात विराट कोहली किती धावा करेल? असे प्रश्न विचारत आहेत. या प्रश्नांची उत्तरेही बसराणी देव नावाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहेत. यामध्ये कोहलीबद्दल असं म्हटले आहे की, तो आजच्या सामन्यात 30 ते 48 धावा करू शकतो.


ट्वीट-



हे देखील वाचा-