(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : मुंबईच्या संघात तीन तर चेन्नईच्या संघात दोन बदल, CSK ने आक्रमक खेळाडूला वगळलं
MI vs CSK, IPL 2022 : चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
MI vs CSK, IPL 2022 : चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईसाठी हा सामना करो अथवा मरो असा आहे. कारण, यंदाच्या हंगमात मुंबईची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. मुंबईने सुरुवातीचे सहाही सामने गमावले आहेत. मुंबईला एक पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात करु शकतो. चेन्नईचीही परिस्थिती वेगळी नाही. चेन्नईलाही सहा सामन्यापैकी पाच सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघाला स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरलेत.
#CSK have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
Live - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/cCOXsXThSY
महत्वाच्या सामन्यात मुंबईच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. मुंबईने रायली मेरीडेथ, ह्रतिक शॉकिन आणि डॅनिअल सॅम यांना संघात संधी दिली आहे. रॅली मेरीडेथ हा वेगवान गोलंदाज आहे. तर ह्रतिक शॉकिन हा फिरकी गोलंदाज आहे. चेन्नईच्या संघातील डाव्या हाताचे फलंदाज असल्यामुळे मुंबईने शॉकिनला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाच्या सामन्यात चेन्नईने आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. चेन्नईने मोईन अली आणि ख्रिस जॉर्नला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्याजागी Dwaine Pretorius आणि मिचेल सँटनेरला संधी देण्यात आली आहे.
कसा आहे मुंबईचा संघ?
ईशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनिअल सॅम्स, रायली मेरेडेथ, ह्रतिक शॉकिन, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह
चेन्नईचे 11 किंग्स कोण?
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा (कर्णधार), एम. एस धोनी (विकेटकिपर), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, डेवेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा
A look at the Playing XI for #MIvCSK
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
Live - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL https://t.co/4we4V7AZj1