Covid-19 Hits IPL 2022 : दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे अनेक नियमांतंर्गत सुरु असलेली आयपीएल यंदा कुठे भारतात मर्यादीत प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडत होती. पण आता आयपीएलच्या या 15 व्या (IPL 2022) हंगामावर देखील कोरोनाचं संकट घोंगावत आहे. दिल्ली संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आता यंदाची आयपीएल रद्द करा अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. नेटकरी मोठ्या प्रमाणात आयपीएल रद्द करण्याची मागणी करत असल्याने 'Cancel IPL' हा हॅशटॅगही ट्रेन्ड होताना दिसत आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाचे (DC) फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूला देखील कोरोनाची बाधा झाल्याने दिल्ली संघाने आगामी सामन्यासाठी पुण्याला जाणं रद्द केलं आहे. तसंच संपूर्ण संघाला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. क्रिकबज या वेबसाईटने याबाबत वृत्त दिलं असून संबधित खेळाडूची आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट देखील केली जाणार आहे. दरम्यान दिल्ली संघात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे बायोबबलमध्ये कोरोनाची एन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान सामन्यांना प्रेक्षकांची देखील उपस्थिती असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढू नये यासाठी ही मागीणी नेटकरी करत आहेत.
कोरोनाच्या शिरकावामुळे मागील वर्षीही व्यत्यय
मागील वर्षी अर्थात 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे आयपीएल 2021 चा हंगाम 4 मे 2021 रोजी अर्ध्यातूनच थांबवावा लागला होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल सामने दुबईमध्ये घेण्यात आले होते. 2021 मध्ये सनराइजर्स हैदराबाद (SRH) चा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित कऱण्यात आले होते. 2021 मध्ये 29 लीग सामने झाल्यानंतर बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामने दुबईमध्ये खेळवले होते. तर कोरोना महामारीमध्ये 2020 चा हंगामही दुबईत झाला होता.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्लीचे फिजियो कोरोना पॉझिटिव्ह
- PBKS vs SRH, IPL 2022: हैदराबादविरुद्ध सामन्यात शिखर धवन पंजाबचा कर्णधार; मयांक अग्रवाल संघाबाहेर, नेमकं कारण काय?
- Covid-19 Hits IPL 2022 : आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं संकट, दिल्लीच्या खेळाडूला बाधा, आगामी सामन्यासाठी पुण्यालं जाणं रद्द