IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहे. मात्र, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच काही संघासाठी वाईट बातमी समोर आलीय. आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियन संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-20 सामना खेळायचा आहे.


दरम्यान, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं आज पाकिस्तानविरुद्ध त्यांचा एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-20 सामन्यासाठी संघ जाहीर केलाय. ज्यात आयपीएल 2022 मध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकाचा कर्णधार आरोन फिंच, मार्कस स्टॉइनिस, मिचेल मार्श आणि शॉन अॅबॉट यांचाही समावेश आहे. हे सर्व खेळाडू 5 एप्रिलपर्यंत पाकिस्तानमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. त्यानंतरच आयपीएल खेळण्यासाठी भारतात दाखल होणार आहे. 


आयपीएलच्या मेगा ऑक्शमध्ये आरोन फिंच अनसोल्ड ठरला होता. मात्र, त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सच्या संघानं विकत घेतलं. तर, मिशेल मार्शला दिल्ली कॅपिटल्सनं 6.50 कोटी रुपयांना आणि मार्कस स्टोइनिसला लखनौनं 9.20 कोटी रुपयांना लिलावापूर्वी ड्राफ्ट केलं होतं. याशिवाय, शॉन अॅबॉटला सनरायझर्स हैदराबादनं 2.40 कोटींना विकत घेतलं आहे. 


आयपीएलच्या मेगा ऑक्शमध्ये विकत घेतलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू


1) डेव्हिड वॉर्नर- दिल्ली कॅपिटल्स (6.25 कोटी)


2) मिचेल मार्श- दिल्ली कॅपिटल्स (6.50 कोटी) 


3) जोश हेजलवुड-  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (7.75 कोटी)


4) डॅनियल सॅम्स- मुंबई इंडियन्स (2.60 कोटी)


5) जेसन बेहरेनडॉर्फ- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (75 लाख)


6) पॅट कमिन्स-  कोलकाता नाइट रायडर्स (7.25 कोटी)


7) शॉन अॅबॉट- सनरायझर्स हैदराबाद (2.40 कोटी)


8) रिले मेरेडिथ- मुंबई इंडियन्स (1 कोटी)


9) नॅथन एलिस- पंजाब किंग्स (75 लाख)


10) नॅथन कुल्टर-नाईल- राजस्थान रॉयल्स (2 कोटी)


11) मॅथ्यू वेड- गुजरात टायटन्स (2.40 कोटी)


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha