IND vs BAN : आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Womens world cup 2022) भारतीय महिलांची (Indian Women Cricket team) आतापर्यंतची कामगिरी सुमार आहे. पाचपैकी केवळ दोनच सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे सध्या भारत चौथ्या स्थानावर असून बांग्लादेशविरुद्धचा (India vs Bangladesh) सामना स्पर्धेत पुढे पोहचण्यासाठी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.


सद्यस्थितीला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रीका आणि वेस्टइंडीज हे पहिल्या तीन स्थानांवर आहेत. त्यामुळे सध्या सेमीफायनलमध्ये पुढे जाणाऱ्या चार संघामध्ये ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलचं तिकीट मिळालं आहे. दक्षिण आफ्रीकेचा संघही जवळपास सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. पण इतर दोन जागांसाठी इतर सर्व संघात चुरशीची लढत आहे. त्यात आता भारताचे स्पर्धेत केवळ दोन सामने शिल्लक आहेत. यात एक आता बांग्लादेश आणि एक 27 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असेल. हे दोन्ही सामने भारत जिंकल्यास सेमीफायनलमध्ये पोहोचेल आणि पराभूत झाल्यास स्पर्धेबाहेर जाईल. 


बांग्लादेशविरुद्ध भारताचा रेकॉर्ड दमदार


भारतीय महिला टीमने आतापर्यंत बांग्लादेशविरुद्ध चार वनडे सामने खेळले आहेत. खेले हैं. या चारही सामन्यात भारत विजयी झाला आहे. त्यामुळे उद्याही भारत बांग्लादेशला मात देईल अशी आशा आहे. या दोन्ही संघात पहिला सामना 5 वर्षांपूर्वी 2017 मध्ये झाला होता. जो भारताने 9 विकेट्सनी जिंकलेला. भारत विरुद्ध बांग्लादेश महिला संघातील हा सामना न्यूझीलंडमधील हॅमिलटनच्या सेडन पार्क ठिकाणी खेळवला जाणार आहे. भारत आणि बांग्लादेश महिला संघातील हा सामना उद्या अर्थात 21 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा सामना सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha