IPL 2022 Auction: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या पंधराव्या हंगामात दोन नव्या संघाचा समावेश झालाय. लखनौ आणि अहमदाबादचा लीगमध्ये समावेश झाल्यानं 10 संघांमध्ये सामना रंगणार आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यात ऑक्शन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही खेळाडूंना खेरदी करण्यासाठी फ्रँचायझीमध्ये स्पर्धा पाहायला मिळू शकते. फ्रँचायझीचा युवा खेळाडूंना संघात सामील करण्याचा प्रयत्न असेल. तसेच खालील पाच भारतीय खेळाडूंना खरेदी करण्यासाठी  फ्रँचायझी अधिक जोर लावतील. ज्यामुळं ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे खेळाडू कोण आहेत? यावर नजर टाकूयात.


ईशान किशन
टी-20 क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून ईशान किशनला ओळखलं जातं. यापूर्वी ईशान किशन मुंबईच्या संघाकडून खेळायचा. परंतु, फ्रँचायझीनं त्याला रिटेन केलं नाही. यामुळं ईशान किशन खरेदी करण्यासाठी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये स्पर्धा होणार आहे. लिलावात त्यांच्यावर पैशांचा वर्षाव होऊ शकतो.


राहुल चहर 
मुंबईनं ईशान किशनसह राहुल चहरलाही रिलीज केलंय. राहुलचं मुंबईच्या संघासाठी मोठं योगदान राहिलंय. आयपीएलमधील त्याच्या चांगल्या कामगिरीमुळं त्याची भारतीय संघातही निवड झाली. चहरची कामगिरी आणि वय पाहता त्याला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये शर्यत असेल.


रवी बिश्नोई
आयपीएल ऑक्सनमध्ये सर्वांच्या नजरा 21 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईवर असतील. रवी बिश्नोईला 2020 च्या लिलावात पंजाब किंग्जनं विकत घेतलं होतं. त्यानं आपल्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केलं. तो संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्यानं 14 सामन्यात 12 विकेट घेतल्या. आयपीएलच्या मागील हंगामात त्यानं 9 सामन्यात 9 विकेट घेतल्या. त्याच्या कामगिरीमुळं त्याला आयपीएल ऑक्शनमध्ये चांगली रक्कम मिळण्याची शक्यता आहे.


शुभमन गिल
कोलकाताच्या संघानं युवा फलंदाज शुभमन गिलला रिलीज केलंय. त्याला संघाचा भावी कर्णधार म्हटलं जात होतं. कोलकातानं व्यंकटेश अय्यर आणि वरूण चक्रवर्तीला रिटेन केलंय. गिल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यानं गेल्या दोन हंगामात 400 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याला पुन्हा संघात सामील करण्यासाठी कोलकाता मोठी बोली लावेल, अशी अपेक्षा केली जात आहे. 


देवदत्त पडिक्कल
बंगळुरूने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज या खेळाडूंना रिटेन केलंय. तर, स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कलला रिलीज केलंय. पडिक्कलनं आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केलीय. त्यानं 2020 मध्ये 15 सामने खेळले आणि 31.53 च्या सरासरीने 473 धावा केल्या आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha