Novak Djokovic: जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियात प्रवासासाठी मनाई करण्यात आलीय. जोकोविच मेलबर्नमध्ये पोहोचला, तेव्हा त्याचा व्हिसा रद्द करण्यात आलाय. त्यानंतर त्याला मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये पाठवण्यात आलंय. ज्यामुळं क्रिडाविश्वात नव्या वादाला तोंड फुटलंय. हे प्रकरण आता मेलबर्न न्यायालयात पोहोचलंय. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान जोकोविच न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. जोकोविचला त्याच्या वकिलासोबत हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय सवलत हा आधार घेऊन लसीकरणाविना ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या जोकोविचचा मुक्काम लांबणार की त्याला मायदेशी परत पाठवले जाणार, याकडे सर्वाचे लक्ष लागलंय
ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जोकोविच बुधवारी मेलबर्न येथे दाखल झाला. मात्र, त्याला आठ तासांहून अधिक वेळ विमानतळावरच थांबवण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया सरकारनं परदेशी नागिरकांसाठी नवी नियमावली जाहीर केलीय. त्यानुसार, कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी नागरिकांनाच ऑस्ट्रेलियात प्रवेशाची परवानगी आहे. लसीकरणाचा नियम न पाळल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला. त्यानंतर त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये नेले.
जोकोविचला गेल्या चार दिवसांपासून स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये थांबवण्यात आलंय. दरम्यान, जोकोविचचा व्हिजा स्वीकारण्यासाठी आणि ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत खेळण्यासाठी मेलबर्नच्या न्यायालयात व्हर्चुअल सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी भारतीय वेळेनुसार आज पहाटे 4.30 वाजल्यापासून सुरू आहे.
एप्रिल 2020 मध्ये एका फेसबुक लाईव्हदरम्यान जोकोविचनं लसीकरणाविषयी आपलं मत व्यक्त केलं होतं. "व्यक्तिशः माझा लसीकरणाला विरोध आहे आणि प्रवास करता यावा यासाठी मला कोणी लस घ्यायला भाग पाडलेलं मला नको आहे. पण लस बंधनकारक झाली, तर काय होईल? मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. माझं याविषयी स्वतःचं काही मत आहे, आणि ते कधी बदलेल का, हे मला माहिती नाही", असं त्यानं म्हटलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha