IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात खेळला जाणार आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. यासामन्यापूर्वी गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरानं राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला कीक मारली आहे. याचा फोटो गुजरातच्या संघानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडवरून शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महत्वाचं म्हणजे, आशिष नेहरा आणि युजवेंद्र चहल यांच्या चेष्टा सुरू असताना हा गंमतीशीर प्रकार घडला आहे. 


युझवेंद्र चहल आणि आशिष नेहराचे फोटो शेअर करत गुजरात टायटन्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, "या किकवर युजी आणि नेहराजींना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंवरून हे स्पष्टपणे दिसून येते की आशिष नेहरा आणि युझवेंद्र चहल यांच्यात चेष्टा सुरू आहे. 



गुजरात-राजस्थानच्या खेळाळूंनी एकमेकांची घेतली भेट
आयपीएल 2022 च्या प्लेऑफचा पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. याच सामन्याचा सराव करण्यासाठी दोन्ही संघ सोमवारी संध्याकाळी मैदानात उतरली होती. त्यावेळी गुजरात आणि राजस्थान संघातील खेळाडूंनी एकमेकांची भेट घेतली. 


आजच्या सामन्यात विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (24 मे) पहिला क्वालीफायर सामना खेळला जाणार आहे.आजच्या सामन्यात विजय मिळवून थेट अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. कारण, या सामन्यात पराभूत झालेला संघाला एलिमिनेटर सामन्यात विजयी झालेल्या संघासोबत क्वालीफायरचा दुसरा सामना खेळावा लागणार आहे. क्वालीफायर- 2 मध्ये जिंकणारा संघ क्वालीफायर-1 मध्ये जिंकलेल्या संघाशी अंतिम सामना खेळेल.


हे देखील वाचा-