Captain of the Season: भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं (Akash Chopra) गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) आयपीएल 2022 मधील सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवड केली आहे. यंदाच्या हंगामात हार्दिकनं फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत संघाचं नेतृत्व केलं. हार्दिकच्या कर्णधारपदात कोणतीही कमतरता नसल्याचेही त्यानं म्हटलय.


आकाश चोप्रा काय म्हणाला?
आकाश चोप्रानं आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचं कौतूक केलं आहे. हार्दिक पांड्यानं यंदाच्या हंगामात खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे. या हंगामात हार्दिक पांड्यानं धावा केल्या नसत्या तर हा संघ कुठेही पोहोचला नसता. त्याने गोलंदाजी केली नसती तर गुजरातला सहाव्या गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध झाला नसता. गोलंदाजीतही त्यानं चांगली कामगिरी करून दाखवली. गुजरातला आवश्यकता असताना विरुद्ध संघाच्या धावांवर नियंत्रण मिळवलं. गोलंदाजी करताना विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर त्याच्या कर्णधारपदात कोणतीही कमतरता राहिली नाही.त्यानं उत्तम नेतृत्व केलं. माझ्यासाठी तो 'कॅप्टन ऑफ द सीजन' आहे.


हार्दिकचं उत्कृष्ट नेतृत्व
आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी गुजरात टायटन्सनं हार्दिक पांड्याला ड्राफ्ट केलं होते. त्यानंतर गुजरातच्या संघाचं कर्णधारपदही त्याच्याकडं सोपवलं. गुजरातच्या या निर्णयामुळं क्रिकेट तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले. अनेक माजी क्रिकेटपटू हार्दिकच्या गोलंदाजीच्या फिटनेसवर आणि कर्णधारपदावर शंका घेत होते. हार्दिक पांड्या गेल्या अनेक दिवसांपासून गोलंदाजीपासून दूर होता. तसेच त्याला कर्णधारपदाचा अनुभवही नव्हता, हे यामागचं कारण असू शकतं. पण हार्दिक पांड्यानं गुजरातला आयपीएलचा पंधरावा टायटल जिंकून सर्वांच्या प्रश्नांना पूर्णविराम लावलं.  


हार्दिक पांड्याची आयपीएल 2022 मधील कामगिरी
या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हार्दिकचा समावेश होता. त्यानं 44.27 च्या सरासरीनं 487 धावा केल्या. यादरम्यान हार्दिकचा स्ट्राईक रेटही 131.26 होता. हंगामात त्यानं एकूण ४ अर्धशतक झळकावली आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्यानं प्रतिषटक 7.27 धावा दिल्या आणि 8 विकेट घेतल्या. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यातही त्यानं सामनावीराचा पुरस्कार जिंकला.


हे देखील वाचा-