WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) अंतिम सामना कधी, कुठे खेळला जाणार? याची क्रिकेटप्रमींना उस्तुकता लागली आहे. सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या सामन्यादरम्यान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कुठे खेळला जाऊ शकतो? याचं संकेत दिलं आहेत. इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lord's) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या दुसऱ्या सत्राचा अंतिम सामना आयोजित केला जाऊ शकतो. आयसीसी या ऐतिहासिक मैदानावर अंतिम सामन्याचं आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहे.


लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आतापर्यंत पाच आयसीसी पुरुष विश्वचषक अंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर आयोजित करण्याची तयारी सुरू केल्याचं संकेत आयसीसीनं दिलंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना गेल्या वर्षीच लॉर्ड्सवर खेळवला जाणार होता. परंतु कोरोनामुळं तो साउथॅम्प्टनमधील एजिस बाउल मैदानावर हलवण्यात आला. न्यूझीलंडनं अंतिम फेरीत भारताचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलं होतं.


आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले काय म्हणाले?
"मला असं वाटतं की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यासाठी लॉर्ड्सचं मैदान ठरवण्यात आलंय. असा आमचा नेहमीच हेतू होता. आम्ही आता कोरोनाच्या नियमातून बाहेर पडत आहोत. त्यामुळे लॉर्ड्सवर अंतिम सामना आयोजित करता, यावा यासाठी आयसीसीनं तयारी सुरू केली आहे."


कार्यकारी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
दरम्यान, ईएसपीएनक्रिकइन्फोनं आपल्या अहवालात सांगितलंय की, आयसीसीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना लॉर्ड्स येथे आयोजित करायचा आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यकारी समितीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं दुसरं सत्र सुरू आहे. गतविजेता न्यूझीलंडला आपले विजेतेपद राखण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. न्यूझीलंड सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे आणि अशा परिस्थितीत त्यांची अंतिम सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे.


हे देखील वाचा- 


Wasim Jaffer: 'हम करे तो साला कैरेक्टर ढीला...', लॉर्ड्स कसोटीवरून वसीम जाफरचा इंग्लंडवर निशाणा


ENG vs NZ 1st Test: लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचं जोरदार कमबॅक, इंग्लंडवर दबाव


Hardik Pandya: गुजरातला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याला मिळालं खास 'गिफ्ट'