IPL 2022: क्रिकेटमध्ये टी-20 फॉरमॅट आल्यानंतर क्रिकेटचे रंगरूप बदलले आहे. यात आयपीएलने आणखी भर घातली आहे. आयपीएल गेल्या 14 वर्षात खूप गाजली असून क्रिकेट चाहत्यांनीही या लीगला भरभरून प्रेम दिले. क्रिकेटप्रेमींच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आयपीएलने देखील वेगवेगळ्या हंगामात नवनवीन बदल केले. दरम्यान, आयपीएलच्या पुढच्या हंगामात 8 नव्हेतर, 10 संघ खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. यामुळे हे दोन संघ नेमके कोणते आहेत? याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली होती. मात्र, चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली असून पुढील हंगामात दाखल होणाऱ्या नव्या दोन संघाची नावे समोर आली आहेत.


इंडियन प्रीमियर लीगमध्ये अहमदाबाद आणि लखनौ अशा दोन नव्या संघाची ऍन्ट्री झाली. आरपी संजीव गोयंका समूहाने लखनौच्या संघाला 7,090 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला. तर, सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादच्या संघाला 5600 कोटी रुपयांना खरेदी केला. बीसीसीआयने दोन्ही संघांकडून 12 हजार कोटींची कमाई केली.


ट्वीट-



एकूण 22 उद्योगपती ग्रुपने दोन्ही संघ खरेदी करण्यासाठी रस दाखवला. यात अदानी ग्रुप, ग्लेझर कुटुंब, इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड, टोरेंट फार्मा, ऑरोबिंदो फार्मा, आरपी-संजीव गोयंका समूह, हिंदुस्तान टाइम्स मीडिया ग्रुप, माजी मंत्री नवीन जिंदाल यांचे जिंदाल स्टील, रॉनी स्क्रूवाला आणि तीन खाजगी इक्विटी भागीदारांचा समावेश आहे. परंतु, अखिरेस गोयंका समूह आणि सीव्हीसी पार्टनर यशस्वी झाले.


या संघांच्या समावेशानंतर आयपीएलमधील संघांची संख्या पुढील हंगामापासून 10 होईल. आयपीएलमधील सामन्यांची संख्याही 60 वरून 74 होईल. खेळाडूंच्या बाबतीत बोलायचे झाले तर दोन संघ वाढल्याने किमान ४५ ते ५० नवीन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये 30 ते 35 तरुण भारतीय खेळाडू असतील. आयपीएलच्या दोन नवीन संघांच्या समावेशावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की,  "भारतीय क्रिकेट प्रगती करत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे. तेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही भारतीय क्रिकेट पाहतो आणि तेच आमचे काम आहे."


संबंधित बातम्या-


IND VS PAK : Shaheen Afridi होणार Shahid Afridi चा जावई!पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार शाहिन आफ्रिदी
INDvsPAK : सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या विराट-धोनीसोबत भेटीचे फोटो तुफान व्हायरल