IND VS PAK : Shaheen Afridi होणार Shahid Afridi चा जावई!पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार शाहिन आफ्रिदी

Continues below advertisement

IND vs PAK, T20 WC 2021 : दुबई येथे झालेल्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभावला सामोरं जावं लागलं. पाकिस्तान संघानं भारतीय संघाचा दहा विकेटनं पराभव केला. नाणेफेकीपासूनच सर्व काही भारतीय संघाच्या विरोधात गेलं. पहिल्या चेंडूपासून पाकिस्तान संघानं मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम ठेवली. विश्वचषकात पाकिस्तानकडून पहिल्यांदाच भारतीय संघाचा पराभव झाला. नाणेफेक गमावलेल्या भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 151 धावा करता आल्या. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाला 17व्या षटकात पार केलं. भारतीय संघाच्या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. आगामी सामन्यात भारतीय संघ या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram