INDvsPAK : सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या विराट-धोनीसोबत भेटीचे फोटो तुफान व्हायरल
काल विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सामना झाला. पाकिस्ताननं भारताचा या सामन्यात पराभव करत विक्रम केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यानंतर चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी असली तरी खेळाडूंच्या खेळभावनेमुळं चाहते खूश झाल्याचं पाहायला मिळालं.
सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी टीम इंडियाचा मेन्टॉर महेंद्रसिंह धोनीची भेट घेत त्याच्याकडून मार्गदर्शन घेतलं.
विराट कोहली आणि पाकिस्तानी सलामीवीर मोहम्मद रिझवानचा हा फोटो तर खूप व्हायरल झाला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाला 17व्या षटकात विजय मिळवून दिला.
नाणेफेक गमावल्यानंतर भारताकडून सलामी देण्यासाठी मैदानात आलेले रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माने शून्यावर त्याची विकेट्स गमावली. तर, केएल राहुल 8 चेंडूत केवळ 3 धावा करून माघारी परतला.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझमने आक्रमक खेळी केली. ज्यामुळे पाकिस्तानच्या संघाला भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवता आला आहे. .
मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत 79 तर, बाबर आझमने 52 चेंडूत 68 धावा केल्या
सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंच्या भेटीचे फोटो खूपच व्हायरल होत आहेत.