SRH vs DC Match Update: सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवारी संध्याकाळी होणाऱ्या सामन्याबाबत शंका होती. पण, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की दोन्ही संघांमधील सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेळेवर खेळला जाईल. सध्या नटराजन आणि त्याच्या संपर्कात आलेले खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांना आयसोलेट करण्याल आले आहे. वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.






पथकातील हे लोकही आयसोलेट
वैद्यकीय टीमने खेळाडूच्या संपर्कात आलेल्या 6 सदस्यांना वेगळं केलं आहे. ज्यात संघाचे मुख्य फलंदाज विजय शंकर, संघ व्यवस्थापक विजय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे, डॉ. अंजना वन्नन, लॉजिस्टिक व्यवस्थापक तुषार खेडकर आणि नेट गोलंदाज पेरियासामी गणेशन यांचा समावेश आहे. या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.


बीसीसीआयच्या प्रसिद्धीनुसार, "सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू टी नटराजन आरटी-पीसीआर चाचणीमध्ये कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला आहे. नटराजनने स्वतःला उर्वरित संघापासून वेगळं केलं आहे. आतापर्यंत त्याला कोणतीही लक्षणे दिसत नाहीय. बाकीचे संघाची आज स्थानिक वेळनुसार सकाळी 5 वाजता RT-PCR चाचणी करण्यात आली. यात संपर्कात आलेल्या लोकांचा समावेश आहे. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परिणामी आज रात्री सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेळापत्रकानुसार खेळला जाणार आहे.


आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक  (IPL 2021 Second Phase Mumbai Indians Schedule) 



  • 19 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)

  • 20 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30)

  • 21 सप्टेंबर -  पंजाब वि.राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)

  • 22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स ( सायं. 7.30)

  • 24 सप्टेंबर-  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)

  • 25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30)

  • सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30)

  • 26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स  (दुपारी 3.30)

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. मुंबई इंडियन्स  ( सायं. 7.30)

  • 27 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)

  • 28 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज  ( सायं. 7.30 )

  • 29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30 )

  • 30 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30 )

  • 1 ऑक्टोबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज पंजाब   ( सायं. 7.30 )

  • 2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज    ( सायं. 7.30)

  • 3 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स वि. पंजाब किंग्ज   (दुपारी 3.30)

  • कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज  ( सायं. 7.30)

  • 5 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स   ( सायं. 7.30)

  • 6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि, सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 7 ऑक्टोंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज  (दुपारी 3.30)

  • कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)

  • 8 ऑक्टोबर - सनराजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स  (दुपारी 3.30)

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • 10 ऑक्टोबर - क्वालीफायर 1

  • 11 ऑक्टोबर - एलीमिनेटर

  • 13 ऑक्टोबर - क्वालीफायर 2

  • 15 ऑक्टोबर फायनल