RR vs KXIP : आयपीएल 2020 च्या 9व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा चार विकेट्सने पराभव केला. पंजाबच्या मयंक अग्रवालने दमदार शतक झळकावत 20 ओव्हरमध्ये तीन विकेट्स गमावत 233 धावांचं लक्ष्य राजस्थान रॉयल्ससमोर ठेवलं. त्यानंतर हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानावर उतरलेल्या राजस्थानच्या संघाने संजू सॅमसन 85 धावा आणि राहुल तेवतिया 53 धावा या दोघांच्या दमदार खेळीने 3 चेंडू राखत सामना जिंकला. परंतु, काल रंगलेल्या या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी विजय आपल्याकडे खेचून आणला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


याआधी पहिल्यांदा मैदानावर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या केएल राहुल आणि मयंक अग्रवालने धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 16.3 ओव्हर्समध्ये 183 धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात मोठी ओपनिंग भागीदारी होती.


मयंकने 50 चेंडूंमध्ये 106 धावा आणि राहुलने 54 चेंडूंमध्ये 69 धावा काढल्या, 106 धावा काढणाऱ्या मयंक अग्रवालने आयपीएल 2020 मधील दुसरं शकत ठोकलं. मयंकने फक्त 45 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. कालच्या सामन्यात मयंकने एकूण 9 चौकार आणि 7 षटकार लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 222.22 एवढा होता.


मयंक अग्रवाल व्यतिरिक्त केएल. राहुलनेही 54 चेंडूंमध्ये 69 धावा काढत आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. यादरम्यान राहुलने 7 चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 9 चेंडूंमध्ये दोन चौकार लगावत नाबाद 13 आणि निकोलस पूरनने फक्त 8 चेंडूंमध्ये तीन षटकारांच्या मदतीने 25 धावा काढल्या.


त्यानंतर पंजाबने दिलेल्या 224 धावांचं लक्ष्य भेदण्यासाठी राजस्थान रॉयल्स मैदानावर उतरली. राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. या सीझनमधील आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरलेला जोस बटलर सात चेंडूंमध्ये चार धावा काढत माघारी परतला.


त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनने काउंटर अटॅक सुरु केला. सॅमसनने 42 चेंडूंमध्ये सात षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 85 आणि स्मिथने 27 चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 50 धावा काढल्या.


परंतु, तरिही राजस्थानला जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज होती. अशातच 21 चेंडूंमध्ये 14 धावांवर खेळणाऱ्या राहुल तेवतियाने शेल्डन कॉटरेलच्या एका ओव्हरमध्ये पाच षटकार लगावले आणि राजस्थानला विजय निश्चित झाला. तेवतियाव्यतिरिक्त जोफ्रा आर्चरनेही तीन चेंडूंमध्ये दोन षटकार लगावत नाबाद 13 धावा केल्या आणि आपल्या संघाला रोमांचक लढतीत विजय मिळवून दिला.


महत्त्वाच्या बातम्या : 


मयांक अग्रवाल बनला आयपीएलमधील वेगवान शतक ठोकणारा दुसरा भारतीय