IPL 2020 RR vs KXIP : आयपीएल 2020 च्या 9 व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवालने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल 2020 मधील दुसरे शतक ठोकले. आयपीएलमधील मयंकचे हे पहिले शतक आहे. यापूर्वी या लीगमध्ये मयांकने सर्वाधिक स्कोर 89 होता. जो त्याने यावर्षीचं दिल्ली कॅपिटल्स विरोधात केला होता.


मयांकने आपले शतक केवळ 45 चेंडूंमध्ये पूर्ण केले. या शतकी खेळीमध्ये मयांकने 9 चौकार आणि 7 षटकार लगावले. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट 222.22 होता. यासह, मयांक आयपीएलमधील वेगवान शतक ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.


आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम युसुफ पठाणच्या नावावर आहे. पठाणने आयपीएल 2010 मध्ये अवघ्या 37 चेंडूत शतक ठोकले होते. आता या यादीत मयांक दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. या यादीत आता तिसर्‍या क्रमांकावर मुरली विजय आहे. आयपीएल 2010 मध्येच विजयने 46 चेंडूत शतक ठोकले होते.


ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीनं मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम 


मयांकने 50 चेंडूत 106 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. आयपीएल 2020 स्पर्धेतील हे दुसरे शतक आहे. विशेष म्हणजे या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या दोन्ही फलंदाजांनी दोन्ही शतके ठोकली आहेत.


यापूर्वी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने या मोसमातील पहिले शतक झळकावले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध राहुलने 132 धावांची नाबाद खेळी खेळली. आयपीएलमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे.


Sunil Gavaskar Vs Anushka | सुनील गावसकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काची तिखट प्रतिक्रिया