RR vs KXIP : आयपीएल 2020 च्या 9व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा चार विकेट्सने पराभव केला. पंजाबच्या मयंक अग्रवालने दमदार शतक झळकावत 20 ओव्हरमध्ये तीन विकेट्स गमावत 233 धावांचं लक्ष्य राजस्थान रॉयल्ससमोर ठेवलं. त्यानंतर हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानावर उतरलेल्या राजस्थानच्या संघाने संजू सॅमसन 85 धावा आणि राहुल तेवतिया 53 धावा या दोघांच्या दमदार खेळीने 3 चेंडू राखत सामना जिंकला.


दरम्यान पंजाबच्या फलंदाजांच्या तुफान फटकेबाजीत सामन्यातील सर्वोत्तम क्षण अनुभवायला मिळाला. संजू सॅमसनने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान राजस्थानचा आठव्या षटकात रवी बिश्नोईला षटकार लगावला. सर्वांना हा फटका षटकार जाणार असं वाटत असतानाच सीमारेषेवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत ‘सुपरमॅन’सारखी उडी मारत षटकार अडवला.


निकोलस पूरनने अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा पेश केला. पूरणच्या या शानदार फिल्डींगचं मैदानातील सर्वच खेळाडूंनी कौतुक केले. तर खुद्द फलंदाज संजू सॅमसनसुद्धा चकित झाला.





निकोलस पूरनची ही अप्रतिम फिल्डींग पाहून सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होतं आहे. सचिन तेंडुलकर, हर्षा भोगले, विनोद कांबळी, आकाश चौप्रा, अभिनेता रितेश देशमुख यांनी टवीट करत कौतुक केलं आहे. निकोलस पूरनची ही अप्रतिम फिल्डींग पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही चांगलाच भारावून गेला आहे. आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं हा सर्वोत्तम फिल्डींग आहे. अविश्वसनीय !!





मयांक अग्रवाल बनला आयपीएलमधील वेगवान शतक ठोकणारा दुसरा भारतीय


आयपीएल 2020 च्या 9 व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवालने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल 2020 मधील दुसरे शतक ठोकले. आयपीएलमधील मयंकचे हे पहिले शतक आहे. यापूर्वी या लीगमध्ये मयांकने सर्वाधिक स्कोर 89 होता. जो त्याने यावर्षीचं दिल्ली कॅपिटल्स विरोधात केला होता.


मयांकने आपले शतक केवळ 45 चेंडूंमध्ये पूर्ण केले. या शतकी खेळीमध्ये मयांकने 9 चौकार आणि 7 षटकार लगावले. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट 222.22 होता. यासह, मयांक आयपीएलमधील वेगवान शतक ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.