SRH vs RCB Live Score Updates, IPL 2020 UAE : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं सनरायजर्स हैदराबादसमोर धावांचं 164 आव्हान

IPL 2020 LIVE Score, SRH vs RCB: आज आयपीएल स्पर्धेत विराट कोहली ( Virat Kohli) च्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुचा ( Royal Challengers Bangalore) सामना डेव्हिड वॉर्नरच्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) होत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Sep 2020 10:15 PM
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं सनरायजर्स हैदराबादसमोर धावांचं 164 आव्हान, देवदत्त पडिक्कल आणि एबी डी विलियर्सची अर्धशतके

SRH vs RCB Live Score: सनराइजर्स हैदराबाद (SRH) 8 ओव्हर नंतर बाद 59/1 जॉनी बेयरस्टो आणि मनीष पांडे खेळपट्टीवर. बेयरस्टो 17 चेंडूत 23 आणि पांडे 25 चेंडूत 28 धावांवर खेळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने सनराइजर्स हैदराबादला 164 धावांचे लक्ष्य दिले आहे.
SRH vs RCB Live Score: रॉयल चैलेंजर्स बँगलोर (RCB)- 9 ओव्हर नंतर बिनबाद 75/0. देवदत्त 33 चेंडूत 43 धावांवर तर फिंच 23 चेंडूत 27 धावांवर खेळत आहे.
रॉयल चैलेंजर्स बँगलोरकडून खेळाची सुरुवात आज आरोन आणि और देवदत्त करत आहे. तर हैदराबादच्या संघाकडून भुवनेश्वर कुमार प्रथम गोलंदाजी करत आहे.
SRH vs RCB Live Score: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) - 3 ओव्हर नंतर बिनबाद 20/0. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आरोन फिंच आणि देवदत्त सलामीला.

पार्श्वभूमी

IPL 2020 : विराट कोहलीचा रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि डेव्हिड वॉर्नरचा सनरायजर्स हैदराबादविरुद्ध एकमेकांना भिडणार आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये विराटच्या आरसीबीला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरचा हैदराबाद संघ मात्र त्याच्या सातत्यपूर्ण खेळीसाठी ओळखला जातो. त्यामुळे आजचा सामना तोलामोलाचा होणार आहे.


 


अनेक विक्रम, पण विजेतेपदाची पाटी कोरी. आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा संघ... रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज.. आरसीबीचा विराट कोहली. स्पर्धेत सर्वात मोठ्या फरकानं विजयी झालेला संघ... रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. सर्वाधिक तीन वेळा दहा विकेट्स राखून सामना जिंकणारा संघ... रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. एक ना अनेक असे कितीतरी विक्रम विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या नावावर आहेत. पण गेल्या 12 मोसमांपासून या संघाला प्रतीक्षा आहे ती विजेतेपदाची.


 


प्लेईंग एलेवन :
सनरायझर्स हैदराबादचा संघ ( Sunrisers Hyderabad Playing XI) - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विजय शंकर, प्रियांक गर्ग, अभिषेक शर्मा, मिचेल मार्श, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा.


 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore Playing XI) - आरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, जोश फिलिप, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, डेल स्टेन, उमेश यादव, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.