IPL 2020 Final : आयपीएल 2020 चा अंतिम सामना आज मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स असा रंगणार आहे. 13 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ मंगळवारी आपला पहिला आयपीएलचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या सामन्यात मुंबई पाचव्यांदा तर दिल्ली पहिल्यांदाच चॅम्पियन होण्यासाठी आपापसांत भिडणार आहेत. पण दिल्लीच्या संघात एक हुकुमाचा एक्का आहे, जो संघाला आयपीएलमधील पहिला वहिला विजय मिळवून देऊ शकतो. दिल्लीचा हा हुकुमाचा एक्का म्हणजे, मार्कस स्टॉयनिसनं. दिल्लीचा हा ऑलराउंडर खेळाडू अंतिम सामन्यात आपल्या गोलंदाजीने गेम चेंजर ठरू शकतो.


मार्कस स्टॉयनिसनं 13व्या सीझन दरम्यान फॉर्मात दिसून आला. क्वालिफायर-2 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरोधात सलामीला त्यानं आक्रमक खेळी खेळल्यानंतर गोलंदाजीतही उत्तम कामगिरी केली. स्टॉयनिसने फलंदाजी करून 38 धावांच्या आक्रमक खेळी व्यतिरिक्त गोलंदाजी करत केवळ 26 धावा देत तीन विकेट्स घेतले. त्याला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणूनही गौरवण्यात आलं.


सामन्यात एक वेळ अशी होती की, हैदराबादचा स्टार फलंदाज केन विलियम्सन आपल्या खेळीने दिल्लीला विजयापासून दूर करत होता. अशातच स्टॉयनिसने ऑफ कटर चेंडूवर विलियम्सनला कागिसो रबाडाकडून कॅच आउट करत सामना दिल्लीच्या बाजून फिरवला.





फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत स्टॉयनिसची कमाल


आउट होण्याआधी केन विलियम्सनने 44 चेंडूंमध्ये 67 धावा केल्या. स्टॉयनिसनं विलियम्सनला आउट करण्याआधी मनीष पांडेचाही विकेट घेतला. मुंबईकडे कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या सारखे विस्फोटक गोलंदाज आहेत. त्यामुळे स्टॉयनिसची हटके गोलंदाडी मुंबईला रोखण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. स्टॉयनिसनं या सीझनमध्ये आतापर्यंत 352 धावा केल्या असून 12 विकेट्सही घेतले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : स्टॉयनिसला सलामीला बढती देण्याचा मास्टरस्ट्रोक कुणाचा?