IPL 2024 : आयपीएलचं (Indian Premier league) सीझन सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पण सीझन सुरू होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) नं आपल्या संघाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या मोसमात आरसीबीचा संघ नव्या नावानं प्रवेश करेल. 22 मार्च रोजी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी, फॅफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघानं नवं नाव घेतलं आहे. RCB चा प्रसिद्ध 'RCB Unbox 2024' इव्हेंट मंगळवारी एन चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान संघाचं अधिकृत नाव Royal Challengers Bangalore असं ठेवण्यात आलं आहे.


2014 मध्ये बंगळुरू शहराचे नाव बदलून बेंगळुरू करण्यात आलं होतं. संघाचं नाव बदलून शहराचं अधिकृत नाव ठेवावं, अशी आरसीबीच्या चाहत्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. यावर्षी आरसीबीने आपल्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली. फ्रँचायझीनं या महिन्यात आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ जारी करून नाव बदलण्याचे संकेत दिले होते. अशातच कालच्या RCB Unbox 2024 इव्हेंटमध्ये फ्रँचायझीनं अधिकृतरित्या नाव बदलल्याची घोषणा केली. 






आरसीबीनं अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये आरसीबीचं नवं नाव संघाच्या लोगोसह दाखवून चाहत्यांना खूश केलं. आरसीबीनं संघाच्या नव्या नावाचा फोटो आणि कॅप्शनही पोस्ट केलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "आम्हाला आवडतं शहर... आम्ही स्विकारलेला वारसा आणि आता आमच्यासाठी नव्या अध्यायाची वेळ आली आहे. सादर करत आहोत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. तुमचा संघ, तुमचा आरसीबी."


"आयपीएल जिंकल्यानंतर कसं वाटतं हे मला जाणून घ्यायचं आहे"


आरसीबी अनबॉक्स इव्हेंटमध्ये माजी कर्णधार विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस देखील उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत संघाचं नाव बदलण्यात आलं. विराट कोहली म्हणाला, इथल्या प्रत्येकाला माहीत आहे की, या लीगचं जेतेपद पहिल्यांदाच जिंकणाऱ्या संघासोबत मी नेहमीच उपस्थित राहीन. या फ्रँचायझीसाठी मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. आयपीएल जिंकताना कसं वाटतं, हे जाणून घेणं हेही माझं स्वप्न आहे. या वर्षी आम्ही ते करू अशी आशा आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2024: रोहित माझ्या नेतृत्त्वात खेळणार... मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद मिळताच हार्दिक पांड्याच्या बड्या बाता