नवी दिल्ली : भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता ज्यासाठी लागून राहिलेली असते ती आयपीएलची (IPL) स्पर्धा 22 मार्च पासून सुरु होत आहे. आयपीएलच्या (IPL 2024) व्यवस्थापनानं पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये 10 शहरांमध्ये 21 मॅचेस होणार आहेत. आयपीएलच्या 17 व्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरु (RCB) यांच्यातील मॅचनं होईल. 


यंदाच्या आयपीएलमध्ये गतविजेत्या चेन्नईसमोर इतर संघांचं आव्हान असेल. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनऊ सुपर जाएंटस, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद या या संघांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. आयपीएलमुळं भारतातील अनेक युवा खेळाडूंची आर्थिक स्थिती देखील सुधारली आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट संघाची दारं देखील उघडली आहेत. 


आयपीएलमध्ये  अनेक युवा खेळाडूंना भारतातील आणि जगभरातील नामांकित खेळाडूंबरोबर खेळण्याची करण्याची संधी मिळते. यामुळं त्यांच्या कामगिरीत सुधारणा होते. मात्र, काही खेळाडू संपूर्ण सीझन संपेपर्यंत राखीव खेळाडू म्हणून बेंचवर बसून राहतात. ज्या खेळाडूंना आयपीएलच्या स्पर्धेत एकही सामना खेळण्यासाठी संधी मिळत नाही त्यांना पूर्ण पैसे मिळतात का हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. 


आयपीएलमध्ये खेळून अनेक युवा खेळाडू करोडपती झाले आहेत. आयपीएलच्या लिलावात अनेक खेळाडूंना लाखो रुपयांची बोली लावत फ्रँचायजी आपल्या संघात घेत असतात. काही खेळाडूंना  15-20 कोटी रुपयांची बोली लावली जाते. आयपीएलचा पूर्ण हंगाम बेंचवर बसून राहणाऱ्या खेळाडूंना किती रक्कम मिळते? एकही मॅच न खेळता लाखो करोडो रुपयांची कमाई ते करतात का हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.


संपूर्ण हंगाम बेंचवर बसल्यास पैसे मिळतात का?


आयपीएलमध्ये खेळाडूंना ज्या आधारे पैसे मिळतात तो आधार म्हणजे तो खेळाडू किती सामन्यांसाठी उपलब्ध होता. म्हणजेच एखाद्या खेळाडूला आयपीएलच्या पूर्ण स्पर्धेत एकदाही प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नाही तरी त्याला मिळणाऱ्या मानधनाच्या रकमेवर काही फरक पडत नाही. मात्र, संबंधित खेळाडूला आयपीएल सुरु होण्यापूर्वी प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहण आणि  स्पर्धेदरम्यान उपस्थित पूर्ण वेळ संघासोबत असणं आवश्यक असतं. 


आयपीएल सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत टीम त्यांच्या बेस्ट प्लेईंग इलेव्हन सोबत मैदानात उतरण्याचा प्रयत्न करतात. मात्र, युवा खेळाडूंना पदार्पणाची प्रतीक्षा असते, त्यांना अनेक सामन्यांमध्ये बेंचवर बसावं लागतं. याशिवाय एखादा खेळाडू स्पर्धेदरम्यान जखमी झाल्यास त्याला पूर्ण रक्कम दिली जाते.  संबंधित जखमी खेळाडूच्या उपचाराचा खर्च संबंधित टीम मॅनेजमेंटला करावा लागतो. 


संबंधित बातम्या :


Suryakumar Yadav:सूर्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीनं वाढवलं मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचं टेन्शन, काय घडलं?


Virat Kohli: आरसीबीचा पहिलाच सामना धोनीच्या सीएसकेविरुद्ध, आयपीएलपूर्वी विराटचा नवा लुक समोर, पाहा फोटो