Umran Malik Bowling : गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) सामन्यात गुजरातने 5 विकेट्सनी विजय मिळवला. हैदरबादचा संघ पराभूत झाला असला तरी संघातील युवा गोलंदाज उम्रान मलिकने (Umran Malik) त्याच्या चित्तथरारक वेगाने आणि अफलातून गोलंदाजीने सर्वांनाच चकीत करुन सोडलं. उम्रानने पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारताकडेही दमदार वेगाचे गोलंदाज आहेत. उम्रानच्या वेगाने इतिहासातील दिग्गज शोएब अख्तर, ब्रेट ली, डेल स्टेन अशा साऱ्यांची आठवण करुन दिली. सोशल मीडियावर विविध व्हिडीओही भारतीय क्रिकेटप्रेमी शेअर करताना दिसत आहेत.



डेल स्टेनचा गुरुमंत्र आणि तसंच सेलिब्रेशन


उम्रानने सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने सर्व महत्त्वाचे विकेट्स घेतले. ज्याच गुजरातचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांचा समावेश होता. या यशानंतर या यशामागील कारण सांगताना उम्रानला संघाचा कोच डेलने दिलेला गुरुमंत्र उपयोगी पडल्याचं त्याने सांगितलं. डेल स्टेनने त्याला, 'लाईन-लेंथवर लक्ष नको देऊ, फक्त जमेल तितक्या वेगात टाक', असा सल्ला दिला होता. ज्यामुळे उम्रानने कमाल वेगात गोलंदाजी करत समोरच्या फलंदाजांना सळो की पळो केलं. विशेष म्हणजे या कामगिरीनंतर उम्रानने डेल स्टेन करायचा त्याच प्रकारचं तुफानी सेलिब्रेशननही केलं.



'पहिल्यांदाच पराभूत संघाकडे प्लेयर ऑफ द मॅच'


कोणत्याही क्रिकेट सामन्यानंतर जिंकणाऱ्या संघातील खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ज्यालाच आयपीएलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच असंही म्हटलं जातं, ते अवार्ड दिलं जातं. पण बुधवारच्या सामन्यात मात्र साऱ्यांनाच आश्चर्यचकीत करणारी गोष्ट घडली. सामना पराभूत झाल्यानंतरही सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) उम्रान मलिकला प्लेयर ऑफ द मॅच अवार्ड देण्याक आलं. सामन्यात त्याने अफलातून गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतले, ज्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला. 


हे देखील वाचा-