Sunrisers Hyderabad Umran Malik : हार्दिक पांड्या कर्णधार असणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने (GT) सनरायजर्स हैदराबादवर (SRH) आयपीएलच्या 40 व्या सामन्यात 5 विकेट्सनी विजय मिळवला. पण सामन्यानंतर चर्चा सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) उम्रान मलिकचीच होत आहे. त्याने अफलातू गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतले. उम्रानने सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने सर्व महत्त्वाचे विकेट्स घेतले. ज्याच गुजरातचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांचा समावेश आहे. कोणत्याही अनकॅप्ड गोलंदाजाचं आयपीएलमधील हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.



आयपीएलमध्ये अशी कामगिरी अंकित राजपूत यानेही केली होती. अंकित राजपूतने 2018 साली सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (SRH) 14 रन देत 5 विकेट्स घेतले होते. तर केकेआरच्या वरूण चक्रवर्तीने 2020 साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC) 20 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय आरसीबीचा हर्षल पटेल आणि पंजाब किंग्सचा (PBKS) अर्शदीप सिंह यांनीही हा कारनामा केला आहे.


गुजरातचा 5 विकेट्सनी विजय


हैदराबादने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात सन्माजनक झाली. गिल आणि साहा यांनी 69 धावांची सलामी दिली. उमरान मलिक याने भेदक मारा करत गुजरातच्या अडचणी वाढवल्या. उमरान मलिकने चार षटकात पाच विकेट घेतल्या. उमरान मलिकशिवाय एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. गुजरातकडून साहाने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. त्याशिवाय राहुल तेवातियाने 40 तर राशिद खान याने 31 धावांची नाबाद खेळी करत गुजरातला विजय मिळवून दिला. गिल 22, हार्दिक पांड्या 10, डेविड मिलर 17 आणि अभिनव मनोहर 0 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.  


हे देखील वाचा-