Umesh Yadav in IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यातील आजच्या सामन्यात उमेश यादवकडे अवघ्या 5 विकेट्स घेतल्यास पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे. यामुळे तो युझवेंद्र चहलला मागे टाकू शकतो. सध्या चहल त्याच्या जादूई फिरकी गोलंदाजीच्या जोरावर आयपीएल गाजवत असून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीतही तो अव्वल क्रमांकावर आहे. टीम इंडियामधून विश्वचषकाच्या संघात वगळला गेल्यानंतर चहल आता पुन्हा एकदा कमाल फॉर्ममध्ये असून उमेशही चांगली कामगिरी करत आहे.
केकेआरने 9 पैकी 3 सामने जिंकल्याने ते आठव्या स्थानावर आहेत. तर दुसरीकडे राजस्थान संघाने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकत गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं आहे. त्यात आज दोन्ही संघात सामना होणार असून आतापर्यंतच्या इतिहासाचा विचार करता कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) हे संघ 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांत कोलकात्याने 13 वेळा तर राजस्थानने 12 वेळा सामना जिंकला आहे. तर एक सामना अनिर्णीत सुटला आहे. त्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो. अशात उमेश यादव आणि चहल हे आपआपल्या संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू असल्याने त्यांच्यातही आज एक वेगळी चुरस असणार आहे.
आयपीएल 2022 मध्ये उमेश यादवने 9 सामने खेळत त्यात 14 विकेट्स घेतले आहेत. यावेळी 23 रन देत 4 विकेट्स घेणं त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असून चहलने 9 सामन्यात 19 विकेट्स घेतले आहे. 40 रन देत 5 विकेट्स घेणं हे चहलचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असून आज दोघांपैकी कोण किती विकेट्स घेणार यानंतर पुढील आकडेवारी स्पष्ट होईल. याशिवाय कुलदीप यादवने दिल्लीकडून 9 सामन्यात 17 आणि हैदराबादकडून नटराजननेही 17 विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : भविष्यात चेन्नई सुपर किंग्ससोबतच दिसणार MS Dhoni? दिले महत्त्वाचे संकेत
- Prithvi Shaw violates code of conduct: दिल्लीच्या पृथ्वी शॉ ला 25 टक्क्यांचा दंड, आचारसंहितेचा भंग केल्यामुळं कारवाई
- DC vs LSG, Match Highlights: चुरशीच्या सामन्यात अखेर दिल्ली पराभूत; लखनौ विजयासह पुढील फेरीच्या उंबरठ्यावर