SRH vs CSK : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडणार आहे. राजस्थानने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकत गुणतालिकेत टाप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे. तर कोलकात्याचा संघ मात्र 9 पैकी 3 सामने जिंकल्याने अतिशय खालच्या स्थानावर आहे.  आजवरच्या लढतींमध्ये दोन्ही संघाच्यातील आकडेवारी चुरशीची असल्याने आजचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो.  तर आजच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर फिरवूया...


कोलकाता विरुद्ध राजस्थान Head to Head


आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) हे संघ 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याने 13 वेळा तर राजस्थानने 12 वेळा सामना जिंकला आहे. तर एक सामना अनिर्णीत सुटला आहे. इतक्या अटीतटीचा इतिहास असल्याने आजचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो.


आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11  


कोलकाता - अॅरॉन फिंच, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, नितीश राणा, बाबा इंद्रजीत (विकेटकिपर), आंद्रे रसेल, सुनिल नारायण, उमेश यादव, हर्षीत राणा, टीम साऊथी


राजस्थान - संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, करुन नायर, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल


हे देखील वाचा-