SRH vs GT : आज आयपीएलमधील 21 व्या सामन्यात हैदराबाद आणि गुजरात हे संघ मैदानात उतरणार आहेत. आयपीएलमध्ये यंदा नव्याने सामिल झालेला गुजरात संघ आतापर्यंत दमदार कामगिरी करत आहे. 3 पैकी 3 सामने त्यांनी जिंकल्याने ते तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे हैदराबादने देखील त्यांचा शेवटचा सामना बलाढ्य चेन्नईविरुद्ध जिंकला आहे. त्यामुळे आज एक दमदार सामना पाहायला मिळू शकतो. आयपीएलमधील (IPL 2022) या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडे उत्तम खेळाडूंची फौज असली तरी आज कोणत्या खेळाडूंना अंतिम 11 मध्ये संधी मिळेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) या सामन्यात दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण तरी आतापर्यंतच्या खेळीच्या जोरावर कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल यावर एक नजर फिरवूया...


हैदराबादचे संभाव्य अंतिम 11  


अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, टी. नटराजन, कार्तिक त्यागी 


गुजरातचे संभाव्य अंतिम 11  


शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, दर्शन नालकांडे 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha