RR Vs LSG: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. रविवारी लखनौविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात त्यानं चार विकेट घेऊन राजस्थानच्या संघाला दमदार विजय मिळवून दिला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात युजवेंद्र चहल भरमैदानात पंचाशी भिडल्याचं दिसत आहे. नेमकं कशामुळं युजवेंद्र चहल भडकला? हे जाणून घेऊयात. 


रविवारी आयपीएलचे डबल हेडर सामने खेळण्यात आले. यातील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला गेला. या सामन्यात रोमांचक राजस्थानच्या संघानं लखनौचा तीन धावांची पराभव केला. या विजयासह राजस्थानचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. 



नेमकं काय घडलं?
या सामन्यात युजवेंद्र चहलनं चार षटकात 41 धावा देऊन 4 महत्वाचे विकेट्स घेतले. या हंगामात युजवेंद्र चहलनं तिसऱ्यांदा डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. दरम्यान, आठराव्या षटकात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं युजवेंद्र चहलकडं चेंडू सोपवला. या षटकातील चौथ्या चेंडूवर पंचांनी वाईडचा इशारा दिला. परंतु, हा वाईड नाही असं म्हणत युजवेंद्र चहलनं पंचाशी भिडला. त्यानंतर संजू सॅमसननं हस्तक्षेप करून वाद मिटवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यात कमेंटेटर्स यांनी देखील हा चेंडू वाईड नसल्याचं म्हटलं आहे. 


लखौनाचा तीन धावांनी पराभव
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या वीसाव्या सामन्यात राजस्थाननं लखनौला 3 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाला 162 धावापर्यंत मजल मारता आली.


हे देखील वाचा-