IPL 2022: मुंबईविरुद्ध विजयाने दिल्ली कॅपिटल्सचा शुभारंभ, पण स्टार ऑलराऊंडर दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का
IPL 2022 : रविवारच्या सामन्याक दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 4 विकेट्सनं पराभूत केलं.
IPL 2022, MI vs DC : आयपीएलच्या (IPL 2022) दुसऱ्याच सामन्यात दिल्लीनं मुंबईला (Delhi Capitals vs Mumbai Indians) 4 विकेट्सनं पराभूत केलं. त्यामुळे स्पर्धेची सुरुवात तर दिल्लीने (DC vs MI) दमदार केली आहे. पण दुसऱ्याच दिवशी संघाला एक धक्का बसला असून संघाचा स्टार ऑलराऊंडर मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून याठिकाणीच मार्शला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने मार्शच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.
सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान (Australia vs Pakistan) दौऱ्यावर असून 29 मार्च म्हणजेच उद्यापासून तीन सामन्यांची वनडे मालिका दोन्ही संघ खेळणार आहेत. पण त्यापूर्वीच मार्श सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे या दौऱ्यानंतर 4 एप्रिलनंतरही तो दिल्ली संघाशी जोडला जाणं कठीण आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 साठी मार्शला तब्बल 6.50 कोटी रुपये देत खरेदी केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
फलंदाज - पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मनदीप सिंह, यश धुल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, अश्विन हॅब्बार
गोलंदाज - चेतन साकरिया, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद, कमलेश नागरकोटी, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दूल ठाकुर
अष्टपैलू - अक्षर यादव, ललित यादव, रिपल पटेल, विक्की ओत्सवाल, मिचेल मार्श
विकेटकीपर- ऋषभ पंत (कर्णधार), केएस भरत, टिम सिफर्ट
फिरकीपटू - कुलदीप यादव, प्रवीण दुबे
हे देखील वाचा-
- IPL 2022 : यंदाच्या हंगामातील पहिली अप्रतिम कॅच, दिल्लीच्या सायफर्टने टीपलेला 'हा' झेल पाहाच
- IPL 2022: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स मैदानात, 'या' खेळाडूंवर असेल सर्वाची नजर
- DC vs MI: इलेक्ट्रिशियनचा मुलगा कसा बनला क्रिकेटर? वाचा मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्माच्या संघर्षाची कहाणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha