GT vs PBKS : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर पंजाब किंग्स संघाचं (Gujrat Titans vs Punjab Kings) आव्हान असणार आहे. दरम्यान गुजरात विरुद्ध पंजाब सामन्यात विजय मिळवताच त्यांच पुढील फेरीत पोहोचण जवळपास निश्चित होईल. त्यांनी आतापर्यंत 9 पैकी 8 सामने जिंकत सर्वात वर स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे पंजाब संघाने 9 पैकी 4 सामने जिंकल्याने ते गुणतालिकेत खालच्या स्थानांमध्ये आहेत. त्याचं पुढील फेरीत पोहोचणं फार अवघड झालं आहे. दरम्यान दोन्ही संघाचं आव्हान एकमेकांसाठी अवघड ठरु शकते त्यामुळे आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल.


आज होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स (GT vs PBKS) या सामन्यात दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार यात शंका नाही. गुजरात संघाची आतापर्यंतची कामगिरी अप्रतिम आहे. त्याचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे, पण पंजाबचं आव्हान मात्र त्यांच्यासमोर आहेच. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 3 मे रोजी होणारा गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-