ICC T-20 World Cup 2024: आगामी 2 जूनपासून आयसीसी टी-20 विश्वचषकाचा (ICC T-20 World Cup 2024) थरार रंगणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आर्यंलंडविरुद्ध होणार असून 9 जूनला भारत आणि पाकिस्तान एकमेकांसोबत भिडणार आहे. सदर टी-20 विश्वचषकाचे सामने कुठे, कधी आणि कसं पाहता येणार, याबाबत जाणून घ्या...
भारत आणि आर्यंलंडचा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता सुरु होईल. तर 9 जून रोजी होणारा भारत आणि पाकिस्तानचा सामना देखील भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता सुरु होईल. विश्वचषकाच्या स्पर्धेतील सर्व सामने एकाचवेळी नसणार आहे. काही सामने भारतीय वेळेनूसार सायंकाळी 6 वाजता, तर काही 8 वाजता आणि काही सामने भारतीय वेळेनूसार रात्री 12.30 खेळवले जाणार आहे.
मोफत पाहता येणार टी-20 विश्वचषकाचा थरार-
वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं मोफत प्रसारन मोबाईलवर पाहाता येणार आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी20 विश्वचषकात भारतीयांना मोफत पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार आहे. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार सामन्याचं लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टी20 विश्वचषक 2024 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहे. त्याशिवाय या स्पर्धेतील सामन्याचं लाईव्ह प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅप मोफत पाहता येणार आहे. 2023 वनडे विश्वचषकाचेही मोफत प्रसारण करण्यात आले होते.
पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात 20 संघ -
टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकात 20 संघाचा सहभाग झाला आहे. 2007 पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली, पण हा इतिहासातील सर्वात मोठा टी20 विश्वचषक असेल. त्यामुळे सुरक्षेचीही सर्व काळजी घेण्यात येईल. आधापासूनच सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली होती. आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा