Mumbai Indians, WPL 2023 : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतमध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 4 मार्च रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्सविरुद्ध होणार आहे. मुंबईचा संघाने सध्या सरावाला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधाराची निवड आज अधिकृतरित्या करण्यात आली आहे. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे चार मार्चपासून हरमनप्रीत मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मुंबईने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे.


“हरमनप्रीत मुंबई इंडियन्सच्या उद्घाटनाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार असेल. हरमनप्रीत सारखी कर्णधार मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत. ती आमच्या संघाला सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा देईल, असे नीता अंबानी म्हणाल्या आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये रोहित शर्मा याच्याकडे मुंबई इंडियन्सच्या संघाची धुरा आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. रोहितप्रमाणेच हरमनप्रीत कौर हिच्याकडून चाहत्यांना आपेक्षा असतील. हरमनप्रीत चाहत्यांच्या आपेक्षा पूर्ण करणार का?




4 मार्चपासून महिला आयपीएल लीगला सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मुंबई संघाचं नेतृत्व हरमप्रीत कौर करत आहे. मुंबईचा संघाला विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. हरमनप्रीत जगातील आघाडीच्या टी 20 फलंदाजापैकी एक आहे. हरमनप्रीत कौरच्या नावावर टी20 मधील जबरदस्त रेकॉर्ड आहे. अनेक वर्षांपासून हरमनप्रीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. ती सध्या टीम इंडियाची कर्णधारही आहे. हरमनप्रीतच्या अनुभवाचा फायदा मुंबईला नक्कीच होईल, यात शंका नाही. हरनप्रीतने आतापर्यंत तब्बल 151 टी 20 सामने खेळले आहेत. हरमनप्रीत कौरने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारतासाठी 3058 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान तिने एक शतक आणि दहा अर्धशतके झळकावली आहेत. सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या 103 आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात हरमनप्रीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक धावांच्या यादीत बेट्स 3820 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर मेग लॅनिंग 3405 आणि स्टेफनी टेलर 3166 धावांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हरमनप्रीत कौरने वुमेन्स टी20 चँलेंज स्पर्धेत सुपरनोवास या संघाचं नेतृत्व केले आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वात सुपरनोवास संघाने जेतेपद पटकावले होते.  


आणखी वाचा : WPL 2023 : हरमनप्रीत किसी से कम नहीं, जाणून घ्या मुंबईच्या कर्णधाराचा टी 20 विक्रम


WPL 2023 साठी मुंबई इंडियन्सचा संघ
धारा गुजर, जिंतीमनी कलिता, प्रियांका बाला, हीदर ग्रॅहम, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर, हुमैरा काझी, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नाटे स्क्राइव्हर, सायका इश्के, इसी वोंग, क्लोए ट्रायन, क्लोए ट्रायव्हन, इश्के.  


कोणते संघ सहभाग घेत आहेत?
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स.


कुठे होणार सामने?
सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.


आणखी वाचा : WPL 2023 : महिलांना क्रिकेटच्या मैदानात फुकटात प्रवेश, सर्वच्या सर्व सामने मोफत, पुरुषांना फक्त 100 रुपयांचं तिकीट!