WPL 2023 : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेला चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. मुंबई (Mumbai Indians) आणि गुजरात (Gujarat Giants) यांच्यामध्ये नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअमवर पहिला सामना रंगणार आहे. महिला आयपीएलचे सर्व सामने मुंबईतील मैदानात रंगणार आहेत. त्यासाठी तिकिटविक्रीला सुरुवात झाली आहे. बूक माय शो (BookMyShow) येथे या स्पर्धेची तिकिटं उपलब्ध आहेत. वुमन्स प्रीमियर लीग पाहण्यासाठी महिलांना आणि मुलींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेच्या सर्व 22 सामन्यासाठी महिलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. 


मुंबई आणि गुजरात या संघामध्ये वुमन्स प्रिमियर लीगमधील पहिला सामना रंगणार आहे. या स्पर्धेत होणाऱ्या 22 सामन्यासाठी तिकिट विक्रीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी महिला आणि मुलींना निशुक्ल प्रवेश दिला जाणार आहे. पुरुषांसाठी तिकिटाची किंमत 100 रुपये ते 400 रुपये इतकी असेल. 


नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडिअमवर झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया महिला T20 मालिकेदरम्यान महिलांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. तर  पुरुषांसाठी नाममात्र दर देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. बीसीसीआयच्या याच धोरणाशी सुसंगत निर्णय वुमन्स प्रीमिअर लीगच्या सामन्यासाठी घेण्यात आला आहे. मैदानावरील उपस्थिती वाढवण्यासाठी आणि महिला क्रिकेटबद्दल लोकांमध्ये अधिक रुची निर्माण व्हावी, यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. 


चार मार्चपासून सुरु होणाऱ्या वुमन्स आयपीएल स्पर्धेची सुरुवात दणक्यात होणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. अभिनेत्री कृती सेनॉन आणि कियारा अडवाणी परफॉर्म करताना दिसणार आहेत.





या स्पर्धेचे प्रेक्षपण जिओ सिनेमा अॅपवर मोफत पाहाता येणार आहे. त्याशिवाय स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरही सामना पाहता येणार आहे. या स्पर्धेचा टायटल स्पॉन्सर टाटा ग्रुप असेल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबतची घोषणा केली.  






आणखी वाचा :


In Photos : दुबईत धोनीच्या नावाचा रोड, पण का? काय आहे कारण