WPL 2023 : हरमनप्रीत किसी से कम नहीं, जाणून घ्या मुंबईच्या कर्णधाराचा टी 20 विक्रम
Women Premier League : महिला आयपीएल लीगला लवकरच सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सर्वांच्या नजरा मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीतवर असतील..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App4 मार्चपासून महिला आयपीएल लीगला सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मुंबई संघाचं नेतृत्व हरमप्रीत कौर करत आहे.
मुंबईचा संघाला विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. हरमनप्रीत जगातील आघाडीच्या टी 20 फलंदाजापैकी एक आहे.
हरमनप्रीत कौरच्या नावावर टी20 मधील जबरदस्त रेकॉर्ड आहे. अनेक वर्षांपासून हरमनप्रीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. ती सध्या टीम इंडियाची कर्णधारही आहे.
हरमनप्रीतच्या अनुभवाचा फायदा मुंबईला नक्कीच होईल, यात शंका नाही. हरनप्रीतने आतापर्यंत तब्बल 151 टी 20 सामने खेळले आहेत.
हरमनप्रीत कौरने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारतासाठी 3058 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान तिने एक शतक आणि दहा अर्धशतके झळकावली आहेत. सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या 103 आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात हरमनप्रीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक धावांच्या यादीत बेट्स 3820 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर मेग लॅनिंग 3405 आणि स्टेफनी टेलर 3166 धावांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
हरमनप्रीत कौरने वुमेन्स टी20 चँलेंज स्पर्धेत सुपरनोवास या संघाचं नेतृत्व केले आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वात सुपरनोवास संघाने जेतेपद पटकावले होते.