मुंबईचा पराभव करत गुजरातने फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये रविवारी फायनलचा थरार पाहायला मिळेल. गुजरातने सलग दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये प्रवेश केला. गुजरातकडून साघिंक खेळाचे प्रदर्शन झाले. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप गुजरातच्या खेळाडूंकडेच आहे. गुजरातच्या यशाचे हेच प्रमुख कारण आहे. पाहूयात गुजरातची गोलंदाजी आणि फलंदाजी कशी राहिली आहे. 


ऑरेंज कॅप गुजरातकडे - 


यंदाच्या हंगामात गुजरातची फलंदाजी शुभमन गिल याच्याभोवतीच होती. शुभमन गिल याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. शुभमन गिल याने गुजरातकडून आणि यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा गिलच्या नावावर आहे. शुभमन गिल याने १६ सामन्यात ६१ च्या सरासरीने ८५१ धावा चोपल्या आहेत. शुभमन गिल याने तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. 


शुभमन गिल याला गुजरातच्या इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली. हार्दिक पांड्या याने ३२५, वृद्धीमान साहा याने ३१७ धावा, विजय शंकर ३०१, साई सुदर्शन २६६ आणि डेविड मिलर याने २५९ धावा चोपल्या आहेत.  गुजरातच्या संघाने आतापर्यंत १३ अर्धशतके आणि तीन शतके झळकावली आहेत. त्याशिवाय गुजरात संघाने ११५ षटकार मारले आहेत.  यामध्ये सर्वाधिक षटकार शुभमन गिल याने ३३ षटकार मारले आहेत. गुजरातच्या संघाने २३८ चौकार लगावलेत. 


पर्पल कॅपच्या स्पर्धेतही गुजरातचे तीन गोलंदाज -


फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात गुजरातचे तीन गोलंदाज पहिल्या तीन क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी, राशिद खान आणि मोहित शर्मा या तीन गोलंदाजामध्ये पर्पल कॅपची स्पर्धा रंगली आहे. मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. तर राशिद खान आणि मोहित शर्मा आजूबाजूलाच आहेत. शमीने १६ सामन्यात २८ विकेट घेतल्या आहेत. तर राशिद खान याने १६ सामन्यात २७ विकेट घेतल्या आहेत. मोहित शर्मा याने १ सामन्यात २४ विकेट घेतल्या आहेत. नूर अहमद याने १२ सामन्यात १४ विकेट घेतल्या आहेत. जोश लिटल आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी सात सात विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्या याने तीन विकेट घेतल्या आहेत. तर यश दयाल याने दोन तर दर्शन नळकांडे याने एक विकेट घेतली. सर्वाधिक निर्धाव चेंडू मोहम्मद शमी याने फेकलेत. शमीने आतापर्यंत १८८ निर्धाव चेंडू फेकलेत. तर राशिद खान याने १३२ आणि नूर अहमद याने ९७ निर्धाव चेंडू फेकलेत. 


मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी यंदाच्या हंगामात दोन वेळा प्रत्येकी चार चार विकेट घेतल्या आहेत. तर राशिद खान याने एका सामन्यात चार विकेट घेण्याचा कारनामा केलाय. मोहित शर्मा याने एका सामन्यात पाच विकेट घेण्याचा रेकॉर्डही केलाय. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा या वेगवान माऱ्याच्या जोडीने ५२ विकेट घेतल्या आहेत. तर  राशिद खान आणि नूर अहमद या जोडीने ४१ विकेट घेतल्या आहेत. या चार गोलंदाजांनी आतापर्यंत ९३ विकेट घेतल्या आहेत.


गुजरातचा संपूर्ण संघ - 


शुभमन गिल, वृद्धिमान साहा (w), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (c), डेविड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, नूर अहमद, यश दयाल, श्रीकर भरत, विजय शंकर, दर्शन नालकंडे, रविश्रीनिवासन साई किशोर, शिवम मावी, मैथ्यू वेड, अल्जारी जोसेफ, अभिनव मनोहर, ओडियन स्मिथ, जयंत यादव, प्रदीप सांगवान, उर्विल पटेल.


आणखी वाचा : 


GT in IPL 2023: हार्दिकची टोळी दुसऱ्यांदा फायनलमध्ये, टायटन्सपुढे किंग्सचे आव्हान, पाहा गतविजेत्याचा यंदाचा प्रवास


IPL मध्ये पैशांचा पाऊस, विजेत्याला 20 कोटी, मुंबईला 7 कोटी; पर्पल-ऑरेंज कॅप जिंकणाऱ्याला किती रुपये? 




WTC विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पण IPL विजेत्यापुढे ही रक्कम किरकोळ