GT Journey to IPL Final :  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. गुजरातने सलग दुसऱ्यावर्षी फायनलमध्ये प्रवेश केलाय. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये २८ मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये गुजरात संघाने दमदार कामगिरी केली आहे. ऑरेंज आणि पर्पल कॅप गुजरातच्याच खेळाडूकडे आहे. सांघिक खेळाच्या बळावर गुजरातने फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहूयात...



क्वालिफायर २ मध्ये विजय -


२६ मे रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. अमहदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर गुजरातने मुंबईचा दारुण पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल याने शतकी खेळी केली. तर मोहित शर्मा याने पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. 


क्वालिफायर 1 मध्ये पराभव -


२३ मे रोजी क्वालिफायर १ च्या सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने चेपकॉकवर गुजरातचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर गुजरातचा संघ १५७ धावांपर्यंत मजल मारु शकला. 



यंदाच्या हंगामात साखळी फेरीत गुजरातची कामगिरी कशी राहिली... 14 सामन्याचा लेखाजोखा 


31 मार्च 2023 - आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामन्याने झाली होती. पहिल्याच सामन्यात गुजरातने विजय मिळत सुरुवात दणक्यात केली. गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. 


4 एप्रिल 2023 - गुजरातने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. 


9 एप्रिल 2023 - कोलकात्याने गुजरातचा तीन विकेटने पराभव केला. याच सामन्यात रिंकू सिंह याने गुजरातच्या यश दयाल याला लागोपाठ पाच षटकार लगावत सामना जिंकून दिला होता. गुजरातचा हा यंदाच्या हंगामातील पहिला पराभव होता. 


13 एप्रिल 2023 - गुजरातने पंजाबचा सहा विकेटने पराभव केला. 


16 एप्रिल 2023 - राजस्थानने गुजरातचा तीन विकेटने पराभव केला. 


22 एप्रिल 2023 - गुजरताचा लखनौवर सात धावांनी विजय.. रोमांचक सामन्यात गुजरातने बाजी मारली.


25 एप्रिल 2023 - गुजरातचा मुंबईवर 55 धावांनी विजय 


29 एप्रिल 2023 - गुजरातने पराभवाचा वचपा काढला.. कोलकात्याला गुजरताने सात विकेटने पराभूत केले. 


2 मे 2023 - दिल्लीने गुजरातला पाच धावांनी हरवले. 


5 मे 2023 - गुजरातने राजस्थानचा दारुण पराभव ेकला. गुजरातने राजस्थानवर नऊ विकेटने विजय मिळवला. 


7 मे 2023 - गुजरातने लखनौचा 56 धावांनी पराभव केला. 


12  मे 2023 - मुंबईने वानखेडेवर गुजरातचा 27 धावांनी पराभव केला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने शतकी केळी केली. तर गुजरातकडून राशिद खान याने अष्टपैलू खेळी केली. गोलंदाजीत चार विकेट घेतल्या तर फलंदाजी अर्धशतक झळकावले. 


15 मे 2023 - गुजरातने हैदराबादचा पराभव केला. शुभमन गिल याच्या शतकी खेळीच्या बळावर गुजरातने 188 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर शमी आणि शर्माच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. हैदराबादकडून क्लासेन याने अर्धशतक झळकावले. तर गोलंदाजीवेळी भुवनेश्वर कुमार याने पाच विकेट घेतल्या.



21 मे 2023 - अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने आरसीबीचा पराभव केला. बेंगलोरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरातने सहा विकेटने विजय मिळवला. आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर साखळी फेरीत गुजरात २० गुणांसह पहिल्या स्थानावर राहिले.