GT vs RR Live Updates : मिलरचं वादळी अर्धशतक, हार्दिकची फटकेबाजी, गुजरातचा राजस्थानवर विजय

GT vs RR Live Updates : कोलकात्याच्या ईडन गार्डनवर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ लढणार, कोण मारणार बाजी?

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 May 2022 11:39 PM
गुजरातची फायनलमध्ये धडक

डेविड मिलरचं वादळी अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या बळावर गुजरातने राजस्थानचा सात विकेट आणि तीन चेंडू राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली. तर राजस्थानचा संघ क्लालिफायर 2 मध्ये खेळणार आहे. 25 मे रोजी होणाऱ्या लखनौ आणि आरसीबी यांच्यातील विजेत्यासोबत क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानचा संघ भिडणार आहे. दरम्यान, मोक्याच्या क्षणी मिलरने नाबाद 68 तर हार्दिक पांड्याने नाबाद 40 धावांची खेळी केली.  

मिलरचं वादळी अर्धशतक, हार्दिकची फटकेबाजी, गुजरातचा राजस्थानवर विजय

डेविड मिलरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने राजस्थानचा सात विकेटने पराभव केला. सहा चेंडूत 16 धावांची गरज असताना डेविड मिलरने पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारत विजय मिळवला.. मिलरने नाबाद 68 धावांची खेळी केली.

डेविड मिलरची अर्धशतकी खेळी

डेविड मिलरने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी केली. मिलरने 35 चेंडूत 50 धावांची खेळी केली.

हार्दिक पांड्या-डेविड मिलरची जोडी जमली

कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेविड मिलर यांनी गुजरातचा डाव सावरलाय.. पांड्या 35 तर मिलर 28 धावांवर खेळत आहे. गुजरातला विजयासाठी 24 चेंडूत 43 धावांची गरज आहे. 

गुजरातला तिसरा धक्का, मॅथ्यू वेड बाद

मॅथ्यू वेड 35 धावांवर बाद झाल्यामुळे गुजरातला तिसरा धक्का बसला आहे. 

GT vs RR Live Updates : गुजरातला दुसरा धक्का, गिल धावबाद

शुभमन गिलच्या रुपाने गुजरातला दुसरा धक्का बसला.. देवदत्त पडिक्कलने गिलला धावबाद केले.. दिल 35 धावा काढून बाद झाला.. गुजरात दोन बाद 75 धावा

गुजरातची सन्माजनक सुरुवात

वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेडने डाव सावरला आहे. दोघांनी 64 धावांची भागिदारी केली आहे. गिल 31 तर वेड 27 धावांवर खेळत आहेत. 

राजस्थान संघाची 188 धावांपर्यंत मजल

GT vs RR IPL 2022 : जोस बटलरच्या 89 धावांच्या बळावर राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या.

हेटमायर बाद, शामीने राजस्थानला दिला धक्का

हेटमायरला बाद करत मोक्याच्या क्षणी शामीने राजस्थानला चौथा धक्का दिला.. हेटमायर चार धावा काढून बाद झाला

बटलरची अर्धशतकी खेळी

यंदाच्या हंगामात तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या जोस बटलरने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. गुजरातच्या भेदक माऱ्यापुढे बटलरची बॅट शांत होती. बटलरने 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जोस बटलर 31 चेंडूत 30 धावांवर खेळत होता.. त्यानंतर अखेरच्या षटकात बटलरने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. बटलरने अर्धशतक करेपर्यंत एकही षटकार लगावला नाही.

हार्दिकचा भेदक मारा, राजस्थानला तिसरा धक्का

हार्दिक पांड्याने देवदत्त पडिक्कला बाद करत गुजरातला तिसरे यश मिळवून दिले... पडिक्कल 28 धावा काढून बाद झाला

बटलरची संथ फलंदाजी, गुजरातची कसून गोलंदाजी

विस्फोटक फलंदाज जोस बटलरची संथ फलंदाजी सुरुच आहे. सलामीला आलेल्या बटलरने 31 चेंडूत फक्त 30 धावा केल्या आहेत. गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत बटलरला शांत ठेवले.

राजस्थानला मोठा धक्का, संजू सॅमसन बाद

साई किशोरने राजस्थानच्या कर्णधाराला दाखवला तंबूचा रस्ता... संजू सॅमसन 47 धावा काढून बाद झाला... राजस्थान दोन बाद 79 धावा

संजूची फटकेबाजी, बटलरचा संयम, राजस्थानची आश्वासक सुरुवात

पहिली विकेट झटपट पडल्यानंतर संजू सॅमसन आणि जोस बटलरने डाव सावरलाय. संजू समसनने फटकेबाजी सुरु केली आहे तर बटलर संयमी फलंदाजी करत आहे. दोघांनी 51 धावांची भागिदारी केली आहे

राजस्थानला पहिला धक्का, यशस्वी जायस्वाल बाद

यश दयालने यशस्वी जायस्वालला वृद्धीमान साहाकरवी झेलबाद करत गुजरातला पहिले यश मिळवून दिलेय.. राजस्थान एक बाद 11 धावा

सामन्याला सुरुवात

यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी डावाची सुरुवात केली.. मोहम्मद शामीने गोलंदाजीची धुरा सांभाळली

लॉकी फर्गुसनला वगळले

मोक्याच्या सामन्यात गुजरात टायटन्सने मोठा बदल केला आहे. गुजरातने अनुभवी लॉकी फर्गुसनला आराम दिला आहे. त्याच्याजागी अल्झारी जोसेफला संधी दिली आहे. लॉकी फर्गुसन मागील हंगामात कोलकात्याकडून खेळला होता.. त्यामुळे ईडन गार्डन मैदानाचा त्याला चांगला अनुभव आहे. पण महत्वाच्या सामन्यात हार्दिक पांड्याने लॉकीला बाहेर बसवले... हार्दिकचा हा निर्णय कितपत यशस्वी ठरतोय... हे सामन्यातच समजणार आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही....

गुजरातची (Gujarat Titans) प्लेईंग 11 -

शुभमन गिल, वृद्धीमान साहा(विकेटकिपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर. साईकिशोर, मोहम्मद शामी, अल्झारी जोसेफ, यश दयाल 

राजस्थानची (Rajasthan Royals) प्लेईंग 11 - 

जोस बटलर, यशस्वी जायस्वाल, संजू सॅमसन (विकेटकिपर, कर्णदार), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेड मेकॉय, यजुवेंद्र चाहल, प्रसिद्ध कृष्णा

गुजरातने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गुजरातचे पारडे जड, पण का?

क्लालिफायर 1 च्या सामन्यात गुजरात संघाचे पारडे जड मानले जात आहे. कारण, शुभमन गिल, मोहम्मद शमी, वृद्धीमान साहा आणि लॉकी फर्गुसन यांना ईडन गार्डनचं मैदान चांगलेच माहित आहे. हे खेळाडू बराच काळ कोलकाता संघाचा भाग होते.. त्यामुळे ईडन गार्डनचा या खेळाडूंना चांगला परिचय आहे. याचा फायदा गुजरातला होऊ शकतो..त्यामुळे गुजरातचं पारडं जड मानले जातेय. 

शुभमन गिलची दमदार कामगिरी

नाणेफेकीचा कौल महत्वाच

मागील दोन दिवसांपासून कोलकात्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे नाणेफीकाचा कौल महत्वाचा ठरणार आहे. 


 





राजस्थान रॉयल्सचे ट्वीट

सामना सुरु होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने ट्वीट केलेय





थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात

GUJARAT TITANS ची साखळी फेरीतील कामगिरी - 

GUJARAT TITANS, IPL 2022 :  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने पदार्पणाच्या आयपीएल हंगामात दमदार कामगिरी केली. सांघिक खेळाच्या बळावर गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. साखळी फेरीत गुजरातच्या संघाने 10 विजय मिळवले तर फक्त चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 
GUJARAT TITANS ची साखळी फेरीतील कामगिरी - 
गुजरातने लखनौचा पाच विकेट आणि दोन चेंडू राखून केला पराभव
दिल्लीचा 14 धावांनी पराभव केला. 
गुजरातचा पंजाबवर सहा विकेटने विजय
हैदराबादचा गुजरातवर आठ विकेट आणि पाच चेंडू राखून विजय
गुजरातकडून राजस्थानचा 37 धावांनी पराभव
हार्दिकच्या गुजरातचा चेन्नईवर तीन विकेटने विजय
कोलकात्याचा गुजरातकडून आठ धावांनी पराभव
गुजरातचा हैदराबादवर पाच विकेटने विजय
आरसीबीचा गुजरातकडून सहा विकेटने पराभव
पंजाबचा गुजरातवर आठ विकेटने विजय
मुंबईकडून गुजरातचा पाच धावांनी पराभव
गुजरातचा लखनौवर 62 धावांनी पराभव
गुजरातचा चेन्नईवर सात विकेट आणि पाच चेंडू राखून विजय
फाफच्या नेतृत्वातील आरसीबीचा गुजरातवर आठ विकेटने विजय 

RAJASTHAN ROYALS - ची साखळी फेरीतील कामगिरी

RAJASTHAN ROYALS - ची साखळी फेरीतील कामगिरी - 
राजस्थानचा हैदराबादवर 61 धावांनी विजय
राजस्थानकडून मुंबईचा 23 धावांनी पराभव
आरसीबीचा राजस्थानवर चार विकेटने विजय
लखनौचा राजस्थानकडून तीन धावांनी पराभव
गुजरातचा लखनौवर 37 धावांनी विजय
कोलकात्यावर राजस्थानचा सात धावांनी विजय
दिल्लीवर राजस्थानचा 15 धावांनी विजय
आरसीबीचा 29 धावांनी पराभव
मुंबईचा राजस्थानवर पाच विकेटने विजय
कोलकात्याचा सात विकेटने विजय
 पंजाबचा सहा गड्यांनी पराभव
दिल्लीचा आठ विकेटने विजय
राजस्थानचा लखनौवर 24 धावांनी विजय
चैन्नईवर पाच गड्यांनी मात


 

चौथ्या क्रमांकावरील संघाच्या हाती केवळ निराशा

प्लेऑफच्या फॉर्मेटला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकवर असलेल्या संघानं विजय मिळवला होता. सनरायजर्स हैदराबादनं 2016 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहून आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. विशेष म्हणजे, गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचा खिताब जिंकता आला नाही

गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावरील संघाची हवा

प्लेऑफच्या फॉर्मेटला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा संघ सर्वाधिक वेळा चॅम्पियन बनला आहे. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाच्या संघानं सहा वेळा विजेतेपद पटकावलं आहे. आयपीएल 2012 मध्ये कोलकाता, 2013 मध्ये मुंबई, 2014 मध्ये कोलकाता, 2015 मध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर  होती. दोन्ही संघ चार वर्षांत दोनदा चॅम्पियन झाले होते. त्याच वेळी, 2018 आणि 2021 मध्ये चेन्नईनं दुसऱ्या क्रमांकावर राहून विजेतेपद पटकावलं होतं.

कसा आहे पिच रिपोर्ट?

आजचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात पार पडणार आहे. राजस्थान रॉयल्सचा रेकॉर्ड या मैदानावर खास नसून त्यांनी या ठिकाणी खेळलेल्या 9 सामन्यांतील केवळ 2 सामने जिंकले आहेत. त्यात मागील 5 सामन्यातील 3 सामने हे चेस करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यात सामनाही सायंकाळी आहे अशामध्ये दवाची अडचणही येऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकून संघ गोलंदाजी आधी घेण्याची अधिक शक्यता आहे.   

IPL : प्लेऑफमध्ये सर्वाधिक षटकार कुणी मारले?

मुंबई आणि चेन्नई संघाने प्लेऑफचे सर्वाधिक सामने खेळले आहेत. प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा आणि षटकार याच संघाच्या खेळाडूंच्या नावावर असणार आहेत. होय... प्लेऑफमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये चेन्नई आणि मुंबईच्या खेळाडूंचा समावेळ आहे. प्लेऑफमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. सुरेश रैनाने प्लेऑफमध्ये आतापर्यंत 40 षटकार मारले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा क्रमांक लागतो. धोनीने प्लेऑफच्या लढतीत तब्बल 28 षटकार मारलेत. तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा फिनिशर आणि अष्टपैलू कायरन पोलार्ड याचा क्रमांक लागतो. कायरन पोलार्डने प्लेऑफच्या लढतीत 25 षटकार मारले आहेत.  चौथ्या क्रमांकावर शेन वॉटसन आहे. वॉटसन चेन्नईकडून खेळला आहे. वॅटसनने 20 षटकार लगावले आहेत. तर या यादीत पाचव्या क्रमांकावर ख्रिस गेलचा क्रमांक लागतो. युनिवर्स बॉल ख्रिस गेलने 18 षटकार लगावले आहेत. 

IPL 2022: प्लेऑफ आणि फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोण?

आयपीएलच्या इतिहासातील प्लेऑफ आणि फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. रैनानं 714 धावा केल्या आहेत. या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 522 धावा केल्या आहेत. तर, 389 धावांसह शेन वॉटसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मायकल हसी (388) चौथ्या आणि मुरली विजय (364) पाचव्या क्रमांकावर आहे. 


 
राजस्थानच्या पाच कमकुवत बाजू, हार्दिकचा गुजरात संघ याचाच घेऊ शकतो फायदा

GT vs RR : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल यांच्यात आज क्लालिफायर 1 चा सामना रंगणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ लढणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये पोहचणार आहे. तर पराभूत संघाला क्लाविफायर 2 खेळण्याची संधी मिळणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरातने आतापर्यंत दमदार कामगिरी केली... त्यामुळे गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातने सांघिक खेळणाच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश केला... राजस्थान संघाचीही कामगिरी दण्यात झाली आहे. राजस्थान संघाच्या पाच कमकुवत बाजू आहे, याचा फायदा गुजरातचा संघ घेऊ शकतो.. पाहूयात.. त्याबाबत 

पार्श्वभूमी

GT vs RR Live Updates, IPL 2022 Qualifier 1 :  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल यांच्यात आज क्लालिफायर 1 चा सामना रंगणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ लढणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये पोहचणार आहे. तर पराभूत संघाला क्लाविफायर 2 खेळण्याची संधी मिळणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरातने आतापर्यंत दमदार कामगिरी केली... त्यामुळे गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातने सांघिक खेळणाच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश केला... राजस्थान संघाचीही कामगिरी दणक्यात झाली आहे.


कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात पार पडणार आहे. राजस्थान रॉयल्सचा रेकॉर्ड या मैदानावर खास नसून त्यांनी या ठिकाणी खेळलेल्या 9 सामन्यांतील केवळ 2 सामने जिंकले आहेत. त्यात मागील 5 सामन्यातील 3 सामने हे चेस करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यात सामनाही सायंकाळी आहे अशामध्ये दवाची अडचणही येऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकून संघ गोलंदाजी आधी घेण्याची अधिक शक्यता आहे.   


गुजरात-राजस्थानची साखळी सामन्यांत दमदार कामगिरी
गुजरात टायटन्स संघ यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा सर्वात पहिला संघ आहे. त्यांनी लीग स्टेजमध्ये 14 सामन्यांतील 10 सामने जिंकले, ज्यामुळे त्यांच्या नावावर सर्वाधिक 20 गुण आहेत. ज्यामुळे ते गुणतालिकेही टॉपवर आहेत. संघाकडून सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. त्यात कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचा संघाला बराच फायदा झाला. याशिवाय आयपीएलच्या साखळी सामन्यात राजस्थाननं ही दमदार प्रदर्शन केलं. दरम्यान, राजस्थाननं 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून 18 गुणांसह प्लेऑफमध्ये धडक दिली. या हंगामात राजस्थानला पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानसाठी जोस बटलरनं आक्रमक फलंदाजी केली. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो अव्वल स्थानी आहे. याशिवाय, युजवेंद्र चहलनंही चांगल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.