GT vs LSG, IPL 2023 Live : पांड्या ब्रदर्स आमने-सामने; सामन्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
IPL 2023, Match 51, GT vs LSG : आयपीएल 2023 मध्ये आज गुजरात (Gujrat Titans) आणि लखनौ (Lucknow Super Giants) या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
गुजरातचा लखनौवर 56 धावांनी विजय
लखनौला सातवा धक्का बसलाय... कृणाल पांड्या बाद झालाय
आय़ुष बडोनीच्या रुपाने लखनौला सहावा धक्का
निकोलस पूरन बाद.. लखनौचा संघ पराभवाच्या छायेत
क्विंटन डि कॉक बाद झालाय.. राशिद खानने केले बाद.. डि कॉक ७० धावांवर बाद झाला
मोहित शर्माने स्टॉयनिसला बाद करत लखनौला दिला तिसरा धक्का... स्टॉयनिस चार धावांवर बाद झालाय
दीपक हुड्डाच्या रुपाने लखनौला दुसरा धक्का बसलाय
राशिद खान याने काइल मेयर्स याचा जबरदस्त झेल घेतला. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर मेयर्स ४८ धावांवर बाद
क्विंटन डि कॉक आणि मेयर्स यांची दमदार सुरुवात सात षटकात ८० धावांची सलामी
लखनौचा दमदार पलटवार... चार षटकात ५० धावांची भागिदारी
लखनौकडून एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. लखनौने आठ गोलंदाजाचा वापर केला. पण एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. मोहसीन खान आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या. इतर सहा गोलंदाजांची पाटी कोरीच राहिली.
साहा बाद झाल्यानंतर शुभमन गिल याने सामन्याची सुत्रे आपल्या हातात घेतली. शुभमन गिल याने मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. चौकारांपेक्षा षटकार जास्त लावत गिल याने धावांचा पाऊस पाडला. शुभमन गिल याला कर्णधार हार्दिक पांड्याने चांगली साथ दिली. पांड्याने १५ चेंडूत दोन षटकार आणि एका चौकारासह २५ धावांची खेळी केली. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांनी दूसऱ्या विकेटसाठी २३ चेंडूत ४२ धावा चोपल्या. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर शुभमन गिल याने मिलरच्या साथीने गुजरातच्या डावाला आकार दिला. शुभमन गिल याने ५१ चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली. या खेळीत गिल याने सात षटकार आणि दोन चौकार लगावले. गिल आणि मिलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४ चेंडूत ४३ धावांची भागिदारी केली. डेविड मिलर याने १२ चेंडूत नाबाद २१ धावांची खेळी केली. या खेळीत मिलरने एक षटकार आणि दोन चौकर लगावले.
वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने गुजरातला वादळी सुरुवात करुन दिली. खासकरुन साहा ने लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. साहाने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. शुभमन गिल याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. साहा फटकेबाजी करत असताना गिलने चांगली साथ दिली. साहा आणि गिल जोडीने १२ षटकात १४२ धावांची सलामी दिली. साहाने मौदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. साहा याने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. गुजरातने पावरप्लेमध्ये ७८ धावांचा पाऊस पाडला होता. साहाने ४३ चेंडूत वादळी ८१ धावांची खेळी केली. या खेळीत साहाने चार षटकार आणि दहा चौकार लगावले. साहा आणि गिल यांनी लखनौच्य प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला.
वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात २२७ धावांपर्यंत मजल मारली. गिल आणि साहा यांनी १४२ धावांची सलामी दिली. गुजरातकडूनची ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागिदारी होय. लखनौला विजयासाठी 228 धावांचे आव्हान आहे.
हार्दिक पांड्या २५ धावांवर बाद झाला.. मोहिनच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्याने घेतला झेल
वृद्धीमान साहाच्या रुपाने गुजरातला पहिला धक्का बसलाय... ४३ चेंडूत ८१ धावांची खेळी करत साहा बाद झालाय
शुभमन गिलचे अर्धशतक... यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक
शुभमन गिलचे अर्धशतक... यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक
गिल आणि साहा यांची शतकी भागिदारी
साहा आणि गिल यांनी वादळी सुरुवात केली आहे. सहा षटकात ७८ धावांचा पाऊस पाडलाय
वृद्धीमान साहाने २० चेंडूत अर्धशतक झळकावले..
काइल मेयर्स, क्विंटन डिकॉक,आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पांड्या (कर्णधार), रवी बिश्नोई, मोहसिन खान, आवेश खान, स्वप्निल सिंह
साहा-गिल सलामीला उतरले आहेत
वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ (इम्पॅक्ट प्लेअर).
कृणाल पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
थोड्याच वेळात होणार नाणेफेक... पांड्या ब्रदर्स असतील आमनेसामने
आयपीएल गुणतालिकेत गुजरात (GT) आणि लखनौ दोन्ही संघ टॉप 4 मध्ये आहेत. गुजरात टायटन्स संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. तर, लखनौ सुपर जायंट्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. गतविजेता गुजरात संघ यंदाच्या मोसमातही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. गुजरात संघाने आतापर्यंतच्या दहा पैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे लखनौ संघाने आतापर्यंत दहापैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) या संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड दिसून आलं आहे. गुजरात टायटन्स संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत, पण लखनौला एकही सामना जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात लखनौ नवा इतिहास रचणार की गुजरात पुन्हा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
GT vs LSG : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज पांड्या ब्रदर्स एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. रविवारी गुजरात (Gujrat Titans) आणि लखनौ (Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. 16 व्या हंगामातील 51 वा सामना गुजरात घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. आहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) दुपारी 3.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या मोसमातील 30 व्या सामन्यात (IPL 2023 Match 30) गुजरातने लखनौचा पराभव केला होता. लखनौ संघ आज पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
अमहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 7 मे रोजी दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे.
GT vs LSG : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 51 व्या सामन्यात आज गतविजेत्या गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) सामना लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यासोबत होणार आहे. क्रृणाल पांड्याच्या नेतृत्त्वात लखनौ संघ तर, हार्दिक पांड्याच्या गुजरात संघ एकमेकांसमोर रणांगणात उतरणार आहेत.
GT vs LSG : आयपीएल 2023 मध्ये आज नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात (Gujrat Titans) आणि लखनौ (Lucknow Super Giants) या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
पार्श्वभूमी
GT vs LSG Match Preview : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज पांड्या ब्रदर्स एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. रविवारी गुजरात (Gujrat Titans) आणि लखनौ (Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. 16 व्या हंगामातील 51 वा सामना गुजरात घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. आहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) दुपारी 3.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या मोसमातील 30 व्या सामन्यात (IPL 2023 Match 30) गुजरातने लखनौचा पराभव केला होता. लखनौ संघ आज पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
GT vs LSG IPL 2023 : लखनौ की गुजरात कोण ठरणार वरचढ?
आयपीएल गुणतालिकेत गुजरात (GT) आणि लखनौ दोन्ही संघ टॉप 4 मध्ये आहेत. गुजरात टायटन्स संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. तर, लखनौ सुपर जायंट्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. गतविजेता गुजरात संघ यंदाच्या मोसमातही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. गुजरात संघाने आतापर्यंतच्या दहा पैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे लखनौ संघाने आतापर्यंत दहापैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
GT vs LSG Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) या संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड दिसून आलं आहे. गुजरात टायटन्स संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत, पण लखनौला एकही सामना जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात लखनौ नवा इतिहास रचणार की गुजरात पुन्हा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो.
GT vs LSG IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) यांच्यात आज 7 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -