GT Vs CSK, IPL 2022: पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्ससमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि अंबाती रायडूनं (Ambati Rayudu) आक्रमक खेळी केली. 


नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये चेन्नईच्या संघानं रॉबिन उथप्पा आणि  मोईन अली यांच्या रुपात दोन विकेट्स गमावले. मात्र, त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायडूंनी संघाचा डाव सावरला. या सामन्यात ऋतुराज गायकवाडनं 48 चेंडूत 73 धावा केल्या. ज्यात पाच षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. तर, रायडूनं 31 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंही दोन षटकार आणि चार चौकार मारले. ऋतुराज आणि रायडू बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि  कर्णधार रवींद्र जाडेजानं शेवटच्या काही षटकात चांगली फटकेबाजी केली. ज्यामुळं चेन्नईच्या संघानं 20 षटकात चार विकेट्स गमावून 169 धावा केल्या. गुजरातकडून अल्झारी जोसेफनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतले. तर, मोहम्मद शामी आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.


संघ-


चेन्नई सुपर किंग्ज: रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकिपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश तिक्षणा, मुकेश चौधरी.


गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकिपर), शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान (कर्णधार), अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.


हे देखील वाचा-