GT Vs CSK, IPL 2022:  आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 29 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातच्या संघानं चेन्नईच्या संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर आज हा सामना खेळला जाणार आहे. या हंगामात गुजरातच्या संघानं पाच पैकी चार सामने जिंकत आपली छाप सोडली आहे. तर, चेन्नईच्या संघानं पहिले चार सामने गमावल्यानंतर पाचव्या सामन्यात बंगळुरूला पराभूत करून पहिला विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


या हंगामात गुजरातच्या संघानं दमदार प्रदर्शन केलं आहे. गुजरातच्या संघानं पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. दुसरीकडं चेन्नईच्या संघानं पाच सामने खेळले आहेत. यातील सुरुवातीचे चार सामने गमावले असून बंगळुरूविरुद्ध खेळण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात पहिला विजय मिळवला आहे. 


पिच रिपोर्ट
आजचा सामना पार पडणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानावर आतापर्यंत पाच पैकी तीन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना दवाची अडचण अधिक येत नसल्याने गोलंदाजी चोख पडते. यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेऊ शकतो. चेन्नईने या ठिकाणी चांगली कामगिरी केली असून आठ पैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे.


संघ- 


चेन्नई सुपर किंग्ज: रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकिपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश तिक्षणा, मुकेश चौधरी.


गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकिपर), शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान (कर्णधार), अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.


हे देखील वाचा-