Mayank Agarwal Injury: मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर आज पंजाब किंग्ज आणि हैदराबाद सनरायझर्स (Punjab Kings Vs Sunrisers Hyderabad) यांच्यात आयपीएलचा 28 सामना खेळला जात आहे. या सामन्यात संघाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचं नेतृत्व करतोय. तर, गेल्या पाच सामन्यात पंजाबचं धुरा संभाळणारा मयांक अग्रवाल आजच्या सामना खेळणार नाही.  हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शिखर धवन टॉससाठी मैदानात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर हैदाराबादविरुद्ध सामन्यात मयांक अग्रवाल का खेळला नाही? यामागचं कारण जाणून घेऊयात. 


शिखर धवन काय म्हणाला?
हैदराबाद विरुद्ध नाणेफेकीसाठी मैदानात आलेल्या शिखर धवन म्हणाला की, "सराव दरम्यान मयांक अग्रवालच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. ज्यामुळं आजच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली. मयांक अग्रवालच्या जागी प्रभसिमरन सिंहला संघात संधी मिळाली आहे. तो लवकरच संघात पुनरागमन करेल. पंजाबच्या संघ चांगली कामगिरी करत आहे. ही कामगिरी पुढे कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू"


पंजाबचं हैदराबादसमोर 152 धावांचं आव्हान
पंजाबविरुद्ध  नाणेफेक जिंकत हैदराबादच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबच्या संघानं 20 षटकात 10 विकेट्स गमावून हैदराबादसमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोन 33 बॉलमध्ये 60 धावांची तुफानी खेळी केली. ज्यात 4 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश आहे.


पंजाबचा संघ-
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह.


हैदराबादचा संघ-
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उमरान मलिक, टी नटराजन.


हे देखील वाचा-